चिखलफेक करणारी विकृती, माझ्यासह कुटुंबाला त्रास देणे भयावह : रुपाली चाकणकर यांची खंत

विशेष प्रतिनिधी

पुणे : गेली वीस बावीस वर्ष सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम करताना ,जसजसा प्रगतीचा आलेख वाढत गेला तशतशी चिखलफेक करणारी विकृती वाढत गेली. प्रत्येक वेळी संयमाने शांतपणाने टीका सहन केली, वैयक्तिक टीका करणं हे माझ्या रक्ताताच नाही.पण आता सगळ्या मर्यादा ओलांडून माझ्यासह कुटुंबाला जो त्रास दिला जातोय ते भयावह आहे, अशी खंत महिला आयाेगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली केली. Rupali Chakankar

एका विद्यार्थिनीसह दोन महिलांनी भोंदू अशोक खरातविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर सोमवारी आणखी तीन गुन्हे दाखल झाल्याची माहिती एसआयटीने दिली. त्यामुळे बाबाविरोधात आता एकूण सहा गुन्हे दाखल झाले असून त्यांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर या खरातच्या ट्रस्टवर पदाधिकारी होत्या. त्यांना देखील चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.



याच दरम्यान चाकणकर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. खरात प्रकरणात मी पहिल्या दिवशीच भूमिका स्पष्ट केली आहे, सत्य समोर येईलच\” असं म्हटलं आहे. रुपाली चाकणकर यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवरून याबाबत एक पोस्ट करत व्हिडीओ देखील शेअर केला आहे. “गेली वीस बावीस वर्ष सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम करताना ,जसजसा प्रगतीचा आलेख वाढत गेला तशतशी चिखलफेक करणारी विकृती वाढत गेली. प्रत्येक वेळी संयमाने शांतपणाने टीका सहन केली, वैयक्तिक टीका करणं हे माझ्या रक्ताताच नाही.पण आता सगळ्या मर्यादा ओलांडून माझ्यासह कुटुंबाला जो त्रास दिला जातोय ते भयावह आहे.

“ज्यांनी हा आयुष्याचा प्रवास जवळून पाहिलाय ,ते सर्व संपर्क करून ‘आम्ही सोबत आहोत’ हे आवर्जून सांगतात.त्या सर्वांचे आभार. खरात प्रकरणात मी पहिल्या दिवशीच भूमिका स्पष्ट केली आहे .तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व त्यानंतरही माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुराव्यासह स्पष्टीकरण दिले आहे. सत्य समोर येईलच. धायरीकर तुमचे मनापासून धन्यवाद!” असं म्हटलं आहे. नेमकं काय घडलं? रुपाली चाकणकर यांच्या बोटाला नेमकी कशामुळे जखम झाली याबाबत देखील लोकांनी माहिती दिली आहे. नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. \”ताई आमच्याकडे दरवर्षी आरतीसाठी येतात. गाडीचा दरवाजा बंद करताना ताईंचं बोट अडकलं. बोटातून रक्त येत होतं. टिश्यू पेपर लावून ताई आरतीला आल्या. मंडळाकडे याचा व्हिडीओ आहे. यामध्ये ताईंच्या हाताला जखम दिसेल. आता जो फोटो व्हायरल होत आहे तो ध चा मा केलं आहे. प्रत्यक्ष जे घडलं ते चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात आहे\” असं विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या अध्यक्षाने सांगितलं आहे.

Mud-slinging perversion, disturbing me and my family is terrifying: Rupali Chakankar’s regret

महत्वाच्या बातम्या