विशेष प्रतिनिधी
मंगळवेढा; Manoj Jarange मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतोय म्हणून माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. त्यासाठी आपल्याच लोकांचा वापर केला जातोय, सुपाऱ्या दिल्या जात आहेत, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे.Manoj Jarange
मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथे शिवजयंती 2026 च्या कार्यक्रमात बोलताना जरांगे यांनी सांगितले की, काही जणांकडून त्यांच्या विरोधात मुद्दाम बोलून घेतले जात आहे, तरीही माझ्यासोबत मायबाप जनता आहे. काही लोकांना मुद्दाम त्यांच्या विरोधात उभे केले जात आहे. तरीही जनतेचा पाठिंबा असल्याने आपल्याला काही होणार नाही.Manoj Jarange
आरक्षणाची लढाई लढताना समाजाने आपली ताकद संघटितपणे दाखवावी, असे सांगताना आरक्षण दिले नाही तर एकेका व्यक्तीला पाहून घेऊ, असा इशारा जरांगे यांनी दिला. ही लढाई कोणत्याही एका पक्षासाठी नसून सर्व पक्षांतील मराठा समाजासाठी आहे, असेही त्यांनी सांगितले.
राजकारण केवळ निवडणुकीपुरते करा, नंतर शेतात लक्ष द्या, असा संदेश देत जरांगे म्हणाले, मुलांच्या शिक्षणावर भर द्या. पोरा-बाळांना अधिकारी करा. आपली मुलं मोठ्या पदावर गेली तर पुढील पन्नास वर्षांची चिंता संपेल. सही घेण्यासाठी कोणाच्या दारात उभे राहावे लागणार नाही.
Murder Plot Against Me for Fighting for Maratha Reservation, Alleges Manoj Jarange
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये, नवनाथ बन यांचा घणाघात
- पुणे महापालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश ; ‘विशेष नियोजन प्राधिकरण’रद्द
- Shiv Sena : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? 18 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- Ajitdada Pawar : अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान’ राबविणार, राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार