विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, एसीबीने, छापा टाकत एका लिपिकाला लाच घेताना पकडले. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना झिरवाळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “या भ्रष्टाचाराशी माझा संबंध सिद्ध झाला तर मी राजीनामा देण्यास तयार आहे.” Narhari Zirwal
एसीबीच्या कारवाईत राजेंद्र ढेरंग या लिपिकाला ५० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात ३५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्याने सुनावणीसंबंधी कागदपत्रे तयार करण्याचे काम पाहत असल्याची माहिती आहे. Narhari Zirwal
या घटनेवर बोलताना झिरवाळ म्हणाले की, “मी दोन दिवसांपासून दिल्लीत आहे. काल जो प्रकार घडला तो चुकीचा आहे. अशा गोष्टी होऊ नयेत. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने पैसे घेणे अयोग्य आहे. जर त्याने पैसे घेतले असतील तर त्याला त्याची शिक्षा भोगावीच लागेल.”
सदर कर्मचाऱ्याचा पूर्वेतिहास माहित होता का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, त्यांच्या समोर यापूर्वी कोणतीही तक्रार आलेली नव्हती. तसेच या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. Narhari Zirwal
विरोधकांचे आरोप
या प्रकरणाचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर झिरवाळ म्हणाले, “जर माझ्यापर्यंत काही संबंध येत असल्याचे सिद्ध झाले, तर मी पूर्ण जबाबदारी घेईन आणि राजीनामा देईन.”
नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघाचे आमदार असून ते राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे नेते आहेत. त्यांनी यापूर्वी विधानसभेचे उपाध्यक्षपदही भूषविले आहे. सध्या त्यांच्या ताब्यात अन्न व औषध प्रशासन विभाग आहे. एसीबीकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अधिक पुरावे समोर आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, मंत्रालयात एका कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचून एका लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.Narhari Zirwal
महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जनतेची कामे पैशाशिवाय होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावे.