विशेष प्रतिनिधी
नाशिक:देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणात आता महाराष्ट्रातील नाशिक कनेक्शन समोर आल्याने तपास यंत्रणांची धावपळ वाढली आहे. या प्रकरणात नाशिकमधील इंदिरानगर परिसरातून ३० वर्षीय शुभम खैरनार या युवकाला ताब्यात घेण्यात आले असून, तो बीएएमएस (आयुर्वेद) शिक्षण घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (SOG) दिलेल्या माहितीनंतर नाशिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
देशातील सर्वात महत्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होत.आता अधिक तपासत समोर असलेल्या माहितीमुळे या प्रकरणाचे थेट कनेक्शन नाशिक सोबत जोडले गेले आहे.महत्वाचे म्हणजे, फुटलेल्या प्रश्नपत्रिकेची कॉपी नाशिक शहरातच प्रसारित झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
दरम्यान,नाशिक मधील फुटलेली प्रश्नपत्रिका अगोदर हरियाणा राज्यात पोहोचवण्यात आली.पुढे बिहार,आंध्रप्रदेश आणि जम्मू काश्मीर मध्ये देखील पसरवण्यात आली.विविध राज्यातील एजंट, कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा संशय तपासा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
नाशिक मधून ताब्यात घेण्यात आलेल्या शुभम खैरनारची सध्या चौकशी सुरू आहे.मोबाईल फोन,लॅपटॉप आणि कॉल रेकॉर्डिंग च्या माध्यमातून अधिक तपास करण्यात येत आहे.
पेपर फुटीचा प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये संतापाची आणि संभ्रमाची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे. अनेक विद्यार्थी संघटनांकडून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
NEET scam reaches Nashik; Question papers suspected to have spread to many states..
महत्वाच्या बातम्या
- CM Fadnavis : शेजारील देशांत पेट्रोल ४५० रुपये; आपण वेळीच सावध व्हायला हवे, पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा
- Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांची ६ तास कसून चौकशी, पूजा-विधी, आर्थिक व्यवहार आणि राजकीय संबंधांवर प्रश्नांची सरबत्ती
-
‘पंचवटी’वरून गदिमा कुटुंबात वाद; पुनर्विकासाच्या हालचालींना सौमित्र माडगूळकर यांचा तीव्र विरोध