Jayant Patil, : जयंत पाटील यांच्यासाठी जागाच नाही, मुख्यमंत्र्यांनीच दिला कथित भाजप प्रवेशाला पूर्णविराम

विशेष प्रतिनिधी

सांगली : Jayant Patil, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची चर्चा अनेक वेळा होते. मात्र आता
मंत्रीमंडळात आता जागाच उरलेली नाही, यामुळे कुणाचा समावेश करण्याचा प्रश्नच नाही असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या कथित भाजप प्रवेशाला पूर्णविराम दिला.Jayant Patil,

ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीतील महायुतीच्या प्रचारासाठी रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. मंत्रीमंडळात आता व्हेकन्सीच उरलेली नाही. पक्षातील आमदारांनाही मंत्रीपद मी देउ शकत नाही, बाहेरच्यांचा तर प्रश्नच नाही असे सांगत जयंत पाटील यांच्या मंत्रीमंडळातील कथित समावेशाला पूर्णविराम दिला. याबाबत स्थानिक नेते मंडळींनी चिंता करण्याचे कारण नाही असेही त्यांनी सांगितले.Jayant Patil,



ते म्हणाले, मी कोणत्या पक्षावर अथवा कोणत्या नेत्यावर टीका करण्याचे नगरपालिका निवडणुकीत टाळत आहे. यापेक्षा आपण काय केले आणिकाय करणार आहे हे सांगून मतदारांना मतदान करण्यावे आवाहन करतो.

ईश्वरपूरचे नामांतर करण्याची मागणी १७२ वर्षे जुनी आहे,
ती आम्ही मान्य केली. आता शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी
प्रयत्न करण्याची गरज आहे. जर आमच्या विचाराचे लोक

सत्तेवर आले तर निश्चितच शहराचा विस्तार करत असताना ज्या मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करायच्या आहेत, यासाठी लागणारा निधी कमी पडणार नाही.

ईश्वरपूर शहरातील शास्तीकर नगरपालिका निवडणुकीनंतर स्थगित करण्यात येईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, या शहरासाठी २४ तास स्वच्छ पाणी मिळावे यासाठी १२४ कोटी व भुयारी गटार योजनेसाठी १९८ कोटींचा निधीही मंजूर केला जाईल. स्वातंत्र्यानंतर खेड े गावाचा विकास हेच ध्येय होते. मात्र, आज महाराष्ट्रात ४० हजार गावात वास्तव्य असलेली लोकसंख्या आणि ४०० शहरातील वास्तव्य असलेली लोकसंख्या समान म्हणजे साडेसहा कोटी आहे. शहरांचाही विकास झाला पाहिजे, त्यांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत असे सरकारचे धोरण आहे. शहराच्या समस्या सोडविण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

No Space for Jayant Patil, CM Shinde Ends Buzz Over Alleged BJP Entry

महत्वाच्या बातम्या