विशेष प्रतिनिधी
कणकवली: Nilesh Rane आम्हाला रोज कोडवर्डमध्ये धमक्या दिल्या जात आहेत. त्यापेक्षा त्यांनी उघडपणे धमकी द्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आपण घेतो, तर बिनधास्त बोलले पाहिजे. मनात जे आहे ते थेट बोलून टाका. रोज हळूहळू का बोलत आहात? कुणाला घाबरत आहात? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी केला आहे.Nilesh Rane
शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठवली. सांगली येथे बोलताना चव्हाण यांनी “नंबर एक हा नंबर एकच असतो” असे विधान केले. या वक्तव्यावर निलेश राणे यांनीही त्यावर प्रत्युत्तर दिले आहे.Nilesh Rane
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मालवण येथे सभा होणार असून, त्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना चव्हाण यांच्या एक नंबर, दोन नंबर विधानाबाबत विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले,“रविंद्र चव्हाण असे का बोलत आहेत, याची मला कल्पना नाही. पण त्यांनी जो दाखला दिला, तो स्व. आर. आर. पाटील यांचा दिला. त्यांना आता काँग्रेसवाले आठवू लागलेत. चव्हाण साहेबांमध्ये अनेक बदल झालेत, त्यापैकी हा एक बदल आहे. फडणवीस साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे आणि मरेपर्यंत तो कायम राहणार. त्यात कुठलाही संशय नाही.
रविंद्र चव्हाण यांनी ‘देवाभाऊच एक नंबर’ असेही म्हटले होते. यावर बोलताना राणे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढे करून त्यांचे नाव खराब करू नका. ते पक्ष आणि सरकारचे उत्तम काम करत आहेत. त्यांच्याबद्दल आदरच आहे. पण चव्हाण जे बोलत आहेत, त्यातून त्यांचा अहंकार दिसून येतो. मोठमोठ्या लोकांचा अहंकार मोडून निघालाय. परिस्थिती आटोक्यात कशी आणायची हे पाहा. ती बिघडवू नका.”
विटा नगरपरिषदेच्या प्रचारसभेत बोलताना चव्हाण यांनी सांगली जिल्ह्याचे नेते स्व. आर. आर. पाटील यांची आठवण काढली. २०१४ मध्ये भाजप सरकार आल्यानंतर आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केलेले भाषण गाजले होते. त्याच भाषणाचा उल्लेख करत चव्हाण म्हणाले,“नंबर एक हा नंबर एकच असतो. नंबर दोनला काही किंमत नसते.
No threats in codewords, Nilesh Rane warns Ravindra Chavan
महत्वाच्या बातम्या
- भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी
- Dilip Walse Patil : माझं राज्यातल वजन थोडं कमी झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली खंत
- ‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका
- Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा काढली खोडी, टी-शर्टवर कुत्र्याचा फोटो आणि ‘RSS’ सारखे दिसणारे अक्षर