विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ravindra Chavan नंबर एक हा नंबर एकच असतो. नंबर दोनला काही किंमत नसते. जे काही आहे ते सर्व देवाभाऊच आहे. सगळ्या बहिणींचाही भाऊ आणि इतरांचाही भाऊ, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी शिवसेना शिंदे गटाला पुन्हा डिवचले आहे.
विटा नगरपरिषदेसाठी प्रचार करताना रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) म्हणाले की, मला 2014 तो दिवस आठवतो. जेव्हा आम्ही फार आनंदात होतो. 2014 ला भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. आम्ही जेव्हा सभागृहात गेलो, त्यावेळी या भागातील उमंदा नेतृत्व आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केलेले भाषण गाजलं होतं. आर. आर. पाटील आपल्या भाषणात म्हटले होते की, मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीत बरेच वर्ष काम केले. मी मोठ मोठी पदे भूषवली आणि नंबर एक होण्याचा प्रयत्न केला. पण नंबर एक होऊ शकलो नाही, कायम नंबर दोनच राहिलो. कारण नंबर एक हा नंबर एकच असतो. नंबर दोनला काही किंमत नसते. हे माझे वाक्य नाही तर आर. आर. पाटील यांचे वाक्य आहे. त्यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ अनेकदा व्हायरल होत असतो,
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी सुरू असून सत्तेत असलेल्या महायुतीत खटके उडताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपामध्ये नेत्यांच्या पक्षांत्तरावरून मोठा वाद झाला होता. त्यानंतर राणे बंधुंमुळे सिंधुदुर्गात शिंदेंची शिवसेना आणि भाजपा आमनेसामने आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशातच भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी तीन दिवसांपूर्वीच म्हटले की, मला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे. त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच रविंद्र चव्हाण यांचे आणखी एक वक्तव्य चर्चेत आले आहे.
दरम्यान, रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात कोणाचेही नाव घेतले नाही, रविंद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा आता रंगली आहे. कारण रविंद्र चव्हाण यांना जळगाव दौऱ्यावर असताना निलेश राणे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, ‘मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाही. मी नंतर यावर भाष्य करेन. त्यानंतर आता रविंद्र चव्हाण यांना आर. आर. पाटील यांचे नाव घेत नंबर दोनला काही किंमत नसते, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत पुन्हा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
“Number Two Has No Value, Everything Is Devendra Bhau”, BJP State Chief Ravindra Chavan Taunts Shinde Sena Again
महत्वाच्या बातम्या
- भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी
- Dilip Walse Patil : माझं राज्यातल वजन थोडं कमी झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली खंत
- ‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका
- Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा काढली खोडी, टी-शर्टवर कुत्र्याचा फोटो आणि ‘RSS’ सारखे दिसणारे अक्षर