Asaduddin Owaisi : हर्षवर्धन सपकाळांच्या समर्थनार्थ ओवैसी मैदानात; स्वातंत्र्यवीर सावरकरांवरही टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Asaduddin Owaisi छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी टिपू सुलतानच्या तुलनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याभोवती सुरू असलेल्या राजकीय संघर्षात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi)  यांनी उडी घेतली आहे. यांवरून भाजपावर जोरदार हल्लाबोल करत टिपू सुलतानांचे समर्थन केले. तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरही टीका केली.



ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले, “टिपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढताना शहीद झाले. त्यांनी इंग्रजांना तुमच्या सावरकरांप्रमाणे तुरुंगातून पत्रे लिहिली नाहीत, तर तलवार उचलून लढाई केली.” इंग्रज सैन्यालाही त्यांच्या मृतदेहाजवळ जाण्याची भीती वाटत होती, असा दावा त्यांनी केला. “दीड तास त्यांचा मृतदेह रणांगणावर पडून होता, पण इंग्रज सैनिक पुढे गेले नाहीत,” असे ते म्हणाले.

ओवैसी यांनी आणखी एक दावा करत सांगितले की, टिपू सुलतान यांच्या सोन्याच्या अंगठीवर ‘राम’ असे कोरलेले होते आणि २०१४ मध्ये त्या अंगठीचा लिलाव झाला होता. “ही गोष्ट खोटी आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam) यांच्या विंग्स ऑफ फायर (‘Wings of Fire) या पुस्तकाचा उल्लेख करत, “रॉकेट तंत्रज्ञानाद्वारे आपण टिपू सुलतानांचे स्वप्न पूर्ण करत आहोत,” असा संदर्भ दिला. तसेच महात्मा गांधी यांनी एका लेखात टिपू सुलतान हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असल्याचे म्हटल्याचा दावा करत भाजपावर टीका केली.
ओवैसी यांनी टिपू सुलतानांच्या कारकिर्दीत हिंदू अधिकाऱ्यांची महत्त्वाची पदे असल्याचे सांगितले. “त्यांच्या फौजेचे सेनापती अप्पाजी राम होते आणि सल्लागार कृष्णा राव होते. मग हेही खोटं आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानण्याचे विधान केल्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपाकडून सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून माफीची मागणीही करण्यात येत आहे.
ओवैसी यांच्या वक्तव्यामुळे हा वाद आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. एकीकडे भाजप टिपू सुलतानांविरोधात आक्रमक भूमिका घेत आहे, तर दुसरीकडे ओवैसी आणि काँग्रेसकडून ऐतिहासिक संदर्भ देत प्रतिवाद केला जात आहे.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हर्षवर्धन सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान हे समकक्षच आहेत असे विधान केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार होत आहे . सपकाळ यांच्यावर भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुणे येथील पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान सपकाळ यांनी केले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, तसेच त्यांनी माफी मागावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

मालेगावात महानगरपालिकेतील उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद निर्माण झालेला असतानाच, त्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानाने आणखी वाद निर्माण झाला आहे. सपकाळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य ज्याप्रकारचे आहे, त्यांनी जो स्वराज्या विचार दिला, त्याच मां: दियाळीत, त्यांच्यानंतर बऱ्याच वर्षांनी टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्याविरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे योद्धे होऊन गेले, भारताचे भूमिपूत्र होऊन गेले, त्यांनी कधीही कोणत्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. त्यामुळे शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांच्याकडे शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.

Owaisi Backs Harshvardhan Sapkal, Targets Veer Savarkar in Tipu Sultan Row

महत्वाच्या बातम्या