विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राने 2024-25 आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यात एकूण 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक प्राप्त केली आहे. गेल्या 10 वर्षांतील सर्वोच्च वार्षिक विक्रम गाठला आहे.
केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रवर्तन विभागाने (DPIIT) जाहीर केलेल्या अहवालानुसा, या आर्थिक वर्षाच्या या कालावधीत येणारी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या आर्थिक वर्षी महाराष्ट्राने फक्त 9 महिन्यातच 2016-17 या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे. अहवालानुसार, एकूण परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा 31% आहे. हा विक्रम राज्याच्या आर्थिक विकासासाठी आणि उद्योगसृष्टीच्या वृद्धीसाठी महत्त्वाचा ठरणार असून, परकीय गुंतवणुकीच्या पुढील वाढीला बळकटी मिळणार आहे.
महाराष्ट्राने २०२४-२५ च्या आर्थिक वर्षातील पहिल्या ९ महिन्यांत (एप्रिल-डिसेंबर २०२४) १,३९,४३४ कोटी रुपये इतकी परकीय थेट गुंतवणूक (FDI) आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक गेल्या १० वर्षांतील कोणत्याही एका वर्षातील वार्षिक FDI पेक्षा अधिक आहे.
ऑक्टोबर २०१९ पासून डिसेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्रात सुमारे ₹६.७२ लाख कोटी थेट परकीय गुंतवणूक ( FDI) झाली आहे, ज्यात सेवा, आयटी (IT), ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र प्रमुख आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) सहभागी झाले होते. त्यामध्ये तब्बल १५ लाख ७० हजार कोटी रुपये गुंतवणुकीसाठी विक्रमी सामंजस्य करार झाले होते. त्यातील ९८ टक्के गुंतवणूक ही विदेशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
उद्योगधंद्यांसाठी पायाभूत सुविधा, कर्मचाऱ्यांचे कौशल्यवर्धन आणि व्यवसायासाठी सोपी प्रक्रिया यामुळे परदेशी गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र FDI मध्ये अव्वल:
२०२४-२५ (एप्रिल-डिसेंबर): ₹१.३९ लाख कोटी (USD १६,६५१ दशलक्ष)
२०२३-२४ (संपूर्ण वर्ष): ₹१.२५ लाख कोटी
२०२२-२३ (संपूर्ण वर्ष): ₹१.१८ लाख कोटी
एकूण (ऑक्टोबर २०१९ ते डिसेंबर २०२४): ₹६,७१,८६३ कोटी (देशातील एकूण FDI च्या ३१%),
इतर राज्यांची तुलना:
१. कर्नाटक: २०२४-२५ – ₹३७,६४७ कोटी ( २०%).
२.गुजरात: ₹४६,६८७ कोटी (१६%).
३. दिल्ली: ₹३७,३३६ कोटी (१३%).
४. तमिळनाडू: ₹२४,३७४ कोटी (५%).
Record foreign investment in Maharashtra in 9 months; Record in 10 years
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल