विशेष प्रतिनिधी
पुणे : Madhuri Misal ससून सर्वोपचार शासकीय रुग्णालयात 2350 पदे मंजूर आहेत. पण त्यातील 769 पदे ही रिक्त आहेत. तसेच 156 नसिंगची पद रिक्त आहेत. म्हणजे वर्ग चारची 50 टक्के पद रिक्त आहेत. ही पदभरती टीसीएस द्वारा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने केली जाते. अनेकवेळा यापूर्वी देखील यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात यासाठी पुन्हा भरती प्रक्रिया राबवण्यासाठी हलचाली केल्या जातील, तसेच वर्ग एक ची 44 आणि वर्ग दोन ची 110 रिक्त पदे तत्काळ भरली जातील अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ ( Madhuri Misal ) यांनी विधानसभेत दिली.Madhuri Misal
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 दरम्यान आज विधानसभेत आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने, आमदार शरद सोनवणे, आमदार भीमराव तापाकिर आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी ससून सर्वोपचार शासकीय रुग्णालया संबंधीत लक्षवेधी प्रश्न मांडला होता. या प्रश्नांना उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव रुग्णालय आहे जेथे पुणे, पिंपरी-चिंचवड सह संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण येत असतात. वर्षाला साडे पाच लाख बाह्यरुग्ण येथे येतात. तर पुणे शहरातील जवळपास साठ हजार रुग्ण येथे अॅडमिट असतात. येथे 155 खाटांचा आय सी यु आहे. मात्र क्षमते पेक्षा जास्त रुग्ण येथे येत असल्याने रुग्णालयांवर अधिकाचा भार पडत आहे.
कॅन्सरचे वाढते रुग्ण पाहता पुण्यात कॅन्सर हॉस्पिटल करण्यासाठी राज्य शासन विचाराधीन आहे. त्यासाठी एम एस आर डी सी कडे जागेची मागणी देखील करण्यात आली आहे. ससून रुग्णालय ही त्यासाठी योग्य जागा आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.
ससून शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा होत असल्याची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर नुकतेच 12 कोटी 94 लाख रुपयांची औषध खरेदी येथे करण्यात आली आहे. तसेच उपकरणांची देखील खरेदी करण्यात आली. तर जिल्हा नियोजन समितीकडे आणखी औषध खरेदीची मागणी केली आहे.
Recruitment process for Class IV employees at Sassoon Hospital to be completed in eight days – Madhuri Misal’s information
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल