विशेष प्रतिनिधी
सातारा : सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर आक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकीदरम्यान पोलिसांच्या मदतीने राजकीय खेळी करण्यात आली. येत्या मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री प्रशासनाच्या भूमिकेबाबत तसेच भाजपच्या काही मंत्र्यांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त करणार आहेत. Satara Zilla Parishad
सातारा जिल्हा परिषदेत महायुती एकत्र लढणार होते. भाजपकडून चर्चेची जबाबदारी ही जयकुमार गोरे यांच्यावर सोपवली होती. शिवसेनेकडून मंत्री शंभूराज देसाई तर राष्ट्रवादीकडून मकरंद आबा पाटील यांच्यावर होती. भाजपने चर्चेची जबाबदारी गोरे सोडून इतर कुठल्याही नेत्याकडे सोपवावी, ही शंभूराज आणि मकरंद पाटील यांची इच्छा होती. भाजपकडून यात कोणताही बदल न केल्याने शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी भूमिका घेत जिल्ह्यात भाजपला एकटे पाडले. मात्र, भाजपने शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नीला अध्यक्षपदी उभे करत नवी चाल खेळली.
देसाई आणि पाटील यांनीही शशिकांत शिंदेंना सोबत घेत स्पष्ट बहुमत मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र, मागच्या दाराने भाजपने काही उमेदवारांशी संपर्क सुरूच ठेवला होता. शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी आपले सर्व सदस्य एकत्र निवडणुकीला आणले मात्र पालकंमंत्र्यांना कळूही न देता पोलिसांनी कारवाई केली. भाजपच्या एका मंत्र्याने जिल्हा परिषद निवडणूकीच्या दुसऱ्या माळ्यावर भाजपच्या एका बड्या मंत्र्याने शंभूराज देसाई यांच्यासोबत हातात हात घालून असलेल्या उमेदवाराचा हात खेचला. या झटापटीत शंभूराज देसाईंच्या हाताला जखम झाली. मात्र, शंभूराज देसाई यांना काही समजणार तोच पोलिस तिथे धावले. अशात तो उमेदवार गळाला लावण्यात यश आल्याने शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी ज्या भाजपमधून उभ्या होत्या त्यांचा विजय झाला.
भाजपाचे संख्याबळ केवळ 28 सदस्यांपर्यंत मर्यादित असतानाही, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अचूक राजकीय रणनीती आखत अतिरिक्त पाठिंबा मिळवला.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार प्रिया शिंदे यांना 33 तर मनीषा फडतरे यांना 32 मते मिळाली. अवघ्या एका मताने त्या विजयी झाल्या. उपाध्यक्षपदाचे उमेदवार राजू भोसले यांनाही 33 मते मिळाली.
मात्र विजय शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सकाळी सुमारे पावणे दहा वाजता गुन्हा नोंदवून अनिल देसाई व संदीप मांडवे या दोन जिल्हा परिषद सदस्यांना अटक केली. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज सकाळी सर्व सदस्य सातारा येथे पोहोचले. त सातारा पोलिसांनी अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना मतदानासाठी जाऊ न देता जिन्यातूनच ताब्यात घेतले. त्यांना महाबळेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले. महाबळेश्वर येथे आणल्यानंतर त्यांना अटकेची कारणे सांगण्यात आली. अटकेनंतर दोघांना प्रथम रुग्णालयात दाखल करण्यात आले व पुढील उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले.
भाजपने प्रशासन व पोलिसांच्या मदतीन े लोकशाहीचा गळा घोटला आहे. आम्हाला मतदान करू दिले नाही. बापू शिंदे यांनी स्वतः हजर होऊन जबाब दिला असतानाही आम्हाला अटक करण्यात आली. असा आरोप अनिल देसाई व संदीप मांडवे यांनी केला. हा मुद्दा शंभुराजे देसाई मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार आहेत.
Satara Zilla Parishad Poll Row Set to Rock Cabinet Meeting
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास