गळचेपी, दुय्यम वागणूक खपवून घेणार नाही, शिवसेना मंत्र्यांचा राजीनाम्याचा इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमधील वाद एकदम टोकाला गेला आहे. भाजपकडून आमची गळचेपी सुरू आहे. सत्ताधारी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री यांना दुय्यम वागणूक मिळतेय. ही बाब आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही राजीनामे देऊ, असा इशारा सत्ताधारी शिवेसनेचे मंत्री आणि आमदार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत मंत्री शंभूराजे देसाई यांना धक्काबुक्की झाली. त्याचे पडसाद आज सकाळपासून उमटत आहेत. राज्याच्या सत्तेत असणारे शिवसेना आणि भाजप हे मित्रपक्ष या निमित्ताने आमने-सामने आलेत. हा संघर्ष काय वळण घेतो, हे पाहावे लागेल.



सातारा जिल्हा परिषद निवडणूक राड्याचे पडसाद आज विधिमंडळात जोरदार उमटले. सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळासमोर निदर्शने केली. त्यानंतर विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झाले. सातारा जिल्हा परिषदेमधील मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार हा लोकशाहीचा खून आहे, असा घणाघात त्यांनी केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी करू. दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिले. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दालनात शिवसेनेच्या विधिमंडळ शिवसेना पक्षाची बैठक घेतली. या बैठकीतही मंत्री आणि आमदार आक्रमक झाले.

Shiv Sena ministers threaten to resign, will not tolerate harassment, inferior treatment

महत्वाच्या बातम्या