विशेष प्रतिनिधी
नाशिक : Ashok Kharat माझे पती काही तज्ज्ञ ज्योतिषी नाहीत. काही जवळच्या व्यक्तींनीच त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे,” असा दावा भोंदूबाबा अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात यांनी केला आहे.Ashok Kharat
महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेला अशोक खरातचे महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र त्याच्या पत्नीने खरात निर्दोष असल्याचे सांगत त्यांना षडयंत्रात अडकवल्याचा आरोप केला आहे.Ashok Kharat
कल्पना खरात म्हणाल्या, माझे पती काही व्यावसायिक ज्योतिषी नाहीत. त्यांच्याच काही जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असून, त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले आहे.
नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी १८ मार्च रोजी पहाटे ३ वाजता अशोक खरातला ताब्यात घेतले. एका ३५ वर्षीय महिलेने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. खरातने पीडितेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा प्राथमिक आरोप असून, त्याने धार्मिक विधी आणि मंत्र-तंत्राच्या नावाखाली अनेक महिलांचा विश्वास संपादन करून त्यांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचा संशय आहे. तसेच अनेक बडे नेते अशोक खरातकडे गेल्याचे समोर आले आहे. अशोक खरात हा रूपाली चाकणकर यांचा अध्यात्मिक गुरु होता. रूपाली चाकणकर या खरातचे पाद्यपूजन करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला.
दरम्यान, या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांनी अशोक खरात याची पाठराखण केल्याचा आरोप आहे.
Stabbed in the Back to Tarnish His Image, Claims Ashok Kharat’s Wife
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास