रुपाली चाकणकरांना सहआराेपी करून नार्काे टेस्ट करा, सुषमा अंधारे यांची मागणी

विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर : भाेंदूबाबा अशाेक खरात प्रकरणात महिला आयाेगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करून त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, दोन दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मुळात राजीनामा नाहीच. आता निघा तुमची गरज नाहीये, असे सर्वांनी सांगितल्यावर रूपाली चाकणकर पदावरून पायउतार झाल्या आहेत. अर्थात राजीनामाही पुरेसा नाही. या प्रकरणी रूपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना सहआरोपी केले पाहिजे आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. कारण त्याच्याशिवाय खुलासे होऊ शकणार नाहीत. या संबंधातल्या अनेक गोष्टी पुढच्या दोन दिवसानंतर मी स्वतः पुढे आणणार आहे. Sushma Andhare

खरात प्रकरणात अनेक लोकांची नावे येण्याची शक्यता आहे. कदाचित ते राजकारणातले असतील. ते प्रशासनातले असतील किंवा इतर क्षेत्रातले असतील. महाराष्ट्रातल्या लोकांच्या इभ्रतेशी खेळायचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याची गय अजिबात होता कामा नये, अशी मागणी त्यांनी केली. Sushma Andhare

ज्यांनी महापालिकेत आमची वाट अडवायचा प्रयत्न केला, ज्यांनी चंद्रपूर महापालिकेत आमची नाकाबंदी करायचा प्रयत्न केला. आम्ही लोकसभेला त्यांची नाकेबंदी करू. अजून अडीच-तीन वर्ष वेळ आहे. ज्यांनी नाकेबंदी केली असेल त्यांच्यापर्यंत मेसेज जाईल बाकीच्यांना मला बोलायची गरज नाही, अशा शब्दात अंधारे यांनी खासदार धानोरकर यांना इशारा दिला.

Sushma Andhare demands that Rupali Chakankar be made a co-accused and subjected to a narco

test.

महत्वाच्या बातम्या