विशेष प्रतिनिधी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणापासून कितीही पळाले तरी त्यांना सोडणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला. Anjali Damania
रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राज्य महिला आयोगाच्या आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपण आपल्या वैयक्तिक कारणांमुळे स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. दमानिया म्हणाल्या, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एखाद्या मॉडेलसारखा राजीनामा दिला. त्यानंतरचे त्यांचे बोलणे ऐकले तर त्यात कुठेही खेद, विनम्रता नव्हती. एक अहंकार होता. यामुळे त्यांना इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे असे वाटते.
अंजली दमानिया यांनी त्यांच्या या राजीनाम्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी एखादे प्रकरण दाबले का? याची चौकशी करण्याचीही मागणी केली.
अंजली दमानिया म्हणाल्या, रुपाली चाकणकरांनी काल राजीनामा दिला. महिला आयोग हा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी असतो. पण त्यांचे अध्यक्षपद अशोक खरातसारख्या भोंदू माणसाला आधार देण्यातच गेले. या प्रकरणी त्यांचा केवळ राजीनामा घेणे पुरेसे नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही कलापट्टी झाली पाहिजे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद हे घटनात्मक पद असते. त्यामुळे त्या पदावर बसून त्यांनी भोंदू खरात विरोधातील केसेस दाबल्या असण्याची शक्यता आहे. त्यावर कडक कारवाई व्हायला हवी.
“Tatakre Can’t Escape Kharat Case, Won’t Be Spared,” Warns Anjali Damania
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास