धर्माबाद शहरात तणाव, शेकडो मतदारांना मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात मतदानाच्या दिवशी शेकडो मतदारांना एका मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. Dharmabad city

सकाळपासूनच पैशांचे आमिष दाखवून मतदारांना येथे बोलावून घेतल्याचे सांगण्यात येत असून, या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी नियोजनपूर्वक मतदारांना एकत्र जमवले आणि त्यांना बाहेर पडू दिले जात नव्हते. या घटनेची माहिती मिळताच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, तसेच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. लोकशाही प्रक्रियेला डाग लावणाऱ्या या प्रकारामुळे निवडणूक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, मतदारांमध्येही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतदान सुरू असतानाच मतदारांना कोंडून ठेवण्याची घटना समोर आल्याने निवडणूक प्रक्रियेला वेगळे वळण लागले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. शांततेत व निर्भय वातावरणात मतदान पार पडावे यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.



नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात मतदानाच्या दिवशी खळबळ उडवणारी घटना समोर आली असून, शेकडो मतदारांना एका मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. सकाळपासूनच पैशांचे आमिष दाखवून मतदारांना येथे बोलावून घेतल्याचे सांगण्यात येत असून, या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी नियोजनपूर्वक मतदारांना एकत्र जमवले आणि त्यांना बाहेर पडू दिले जात नव्हते. या घटनेची माहिती मिळताच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, तसेच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. लोकशाही प्रक्रियेला डाग लावणाऱ्या या प्रकारामुळे निवडणूक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, मतदारांमध्येही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tension in Dharmabad city, hundreds of voters accused of being locked up in the Mangal office

महत्वाच्या बातम्या