Radhakrishna Vikhe Patil : पक्षाचे अस्तित्व संपले, इतके वर्ष पेरले त्याचे प्रायश्चित : राधाकृष्ण विखे पाटील यांचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

शिर्डी :  Radhakrishna Vikhe Patil  शरद पवारांनी इतके वर्ष जे राजकारणात पेरले त्यांचे आता प्रायश्चित करण्याची वेळ आता आली आहे. त्यांच्या पक्षात जर कार्यकर्तेच राहिले नाहीत तर त्यांना अजित पवारांसोबत येण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. त्यांच्या पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे, असा हल्लाबोल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. Radhakrishna Vikhe Patil

पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का नाही याचे उत्तर शरद पवार हेच देऊ शकतील. कारण त्यांनी आतापर्यंत सोयीप्रमाणे अनेक लोकांशी युत्या केल्या आहेत. Radhakrishna Vikhe Patil

विदेशात जाऊन लोकशाहीचे धडे देणाऱ्या काँग्रेसला आता आत्मपरीक्षण करण्याची देखील वेळ राहिलेली नाही, असा घणाघात करत विखे पाटील म्हणाले की, बिहारमध्ये विरोधकांचा सुपडा साफ झाल्यानंतर काँग्रेसचे अस्तित्वच संपुष्टात आल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस ‘एकला चलो रे’ म्हणत आहे, कारण त्यांच्यासोबत जाण्यास कोणी तयार नाही, असे विखेंनी टोलेबाजी केली. बिहारमध्ये काँग्रेसचे नेते नदीत पोहण्याचे प्रदर्शन करत होते, जनतेने त्यांना त्याच नदीत राजकीय गटांगळ्या खायला लावल्या. Radhakrishna Vikhe Patil



राज्यात ठाकरे बंधू, जाणते राजे आणि इतर नेत्यांनी ‘वोट चोरी’च्या मुद्द्यावर मोर्चे काढले होते, असा निशाणा साधत विखे पाटील म्हणाले, लोकांनी यालाच मतपेटीतून योग्य उत्तर दिले.

The party’s existence has ended, it has been sown for so many years and it is paying for it: Radhakrishna Vikhe Patil’s attack on Sharad Pawar