विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sudhir Mungantiwar आमचे मंत्री हुशार आहेत, पण मी सात टर्म आमदार आहे. फक्त सचिवानी सांगितलेलं उत्तर द्यायचे नसते. उत्तरात फक्त हो हे खरे आहे. हे खरे नाही असे म्हणालेत. मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण आहेत, जे अशी उत्तर देतात असा सवाल माजी मंत्री भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यांना केला.Sudhir Mungantiwar
बीड जिल्ह्यातील गुंडगिरी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वाल्मीक कराड सध्या चर्चेत आहे. त्याचा संदर्भ घेत मुनगंटीवार म्हणाले, नस्ती निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयातील वाल्मिक कराडचे नवे अवतार कोण आहेत, असा सवालही त्यांनी केला.
धान उत्पादक शेतकऱ्यांचे झालेले नुकसानाचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला. या धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नसून ती का मिळत नाही असा प्रश्न भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला होता. ते म्हणाले की, “लष्करी अळीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 12 नोव्हेंबर 2024 रोजी प्रस्ताव पाठवला 37958 हेक्टरवरील भाताचे नुकसान झाले. अधिकारी म्हणाले की, आम्ही नुकसानीचे पंचनामे करायचे आदेश दिले नाही. नस्ती निपटारा कायद्यानुसार हे आदेश द्यायला हवे होते. नस्ती निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयातील वाल्मिक कराडचे नवे अवतार कोण आहेत, असा सवालही त्यांनी केला. जीआर नुसार याबाबतचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेणे गरजेचा आहे, ते करावे. पंचनामा देखील होणे गरजेचे होते, आता म्हणतायत की पंचनामे झाले नाही त्याला आम्ही काय करू ? ”
Who is Valmik Karad in the Mantralay, Sudhir Mungantiwar asks
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल