विशेष प्रतिनिधी
पुणे: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाचे महत्वाचे पद रिक्त आहे.महायुतीच्या जागावाटपात महिला आयोगाचे अध्यक्षपद हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेला आलेले आहे,मात्र सध्या रिक्त झालेल्या आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीतील महिला नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी आत्तापर्यंत प्रतिभा शिंदे, डॉ.ज्योती मेटे,मीरा बोरवणकर यांची नावे चर्चेत होती.मात्र,सध्या शिवसेना शिंदे गटात असलेल्या शायना एनसी यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
सध्या शिवसेना शिंदे गटात असलेल्या शायना एनसी यांनी सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे या भेटीनंतर शायना एनसी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचा देखील चर्चा रंगल्या आहेत.
सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेसाठी ज्योती वाघमारे यांना संधी दिल्यानंतर शायना एनसी नाराज असल्याचे सांगितले जात होते.त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर शायना एनसी यांना महिला आयोगाची जबाबदारी दिली जाते का? आणि राष्ट्रवादीतील इतर महिला नेत्यांचा विचार केला जाणार याबद्दल पक्षात चर्चांना उधाण आले आहे.
Will Shayna NC join NCP? Discussions flare up after Deputy Chief Minister Sunetra Pawar’s meeting..
महत्वाच्या बातम्या
- CM Fadnavis : शेजारील देशांत पेट्रोल ४५० रुपये; आपण वेळीच सावध व्हायला हवे, पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा
- Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांची ६ तास कसून चौकशी, पूजा-विधी, आर्थिक व्यवहार आणि राजकीय संबंधांवर प्रश्नांची सरबत्ती
- CM Fadnavis : शेजारील देशांत पेट्रोल ४५० रुपये; आपण वेळीच सावध व्हायला हवे, पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा