Akola Records : अकोल्यात देशातील सर्वाधिक तापमान; विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Akola Records विदर्भातील अकोला येथे रविवारी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात तब्बल ४०.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले असून अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.Akola Records

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी देशातील सर्वाधिक तापमान अकोल्यात नोंदवले गेले. त्यानंतर अमरावती आणि वर्धा येथे ३९.२ अंश सेल्सिअस, तर वाशिममध्ये ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.Akola Records



हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी केला आहे. या भागांत पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, उन्हाळ्याची सुरुवात होत असताना गेल्या महिनाभरापासून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे जमीन कोरडी झाली आहे. दिवसभर पडणारा तीव्र सूर्यप्रकाश जमिनीत साठतो आणि रात्री हीच उष्णता पुन्हा बाहेर पडते. त्यामुळे दिवसाबरोबरच रात्रीही उष्णतेचा त्रास वाढत आहे.

पुढील दोन ते तीन दिवस विदर्भ, मराठवाडा तसेच तेलंगणातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नागरिकांनी दुपारच्या उन्हात बाहेर पडताना काळजी घ्यावी, पुरेसे पाणी पिणे आणि उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Akola Records Highest Temperature in India; Heatwave Alert for Vidarbha

महत्वाच्या बातम्या