विशेष प्रतिनिधी
पुणे : Jay Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता अजित पवार कुटुंबातील सदस्य प्रथमच जाहीरपणे आपली भूमिका मांडणार आहेत. अजितदादांचे सुपुत्र जय पवार उद्या (9 मे तारीख) पत्रकार परिषद घेणार आहेत. यापूर्वी जय पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली होती, आता ते प्रत्यक्ष माध्यमांसमोर येत आहेत.Jay Pawar
जय पवार यांनी यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. विमान अपघातात ‘ब्लॅक बॉक्स’ इतक्या सहजपणे नष्ट होऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला होता. या अपघाताचे ‘निर्विवाद सत्य’ बाहेर आलेच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. DGCA ला उद्देशून केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी VSR कंपनीची सर्व विमाने तात्काळ ‘ग्राउंड’ करण्याची आणि रोहित सिंह यांना अटक करण्याची मागणी केली होती. ही ‘एका मुलाची आर्त हाक’ असल्याचे त्यांनी म्हटले होते.Jay Pawar
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अपघाताबाबत म्हणाल्या, अनेक एजन्सीमार्फत चौकशी सुरू आहे. सध्या जो अहवाल समोर आला आहे, तो केवळ ‘प्राथमिक’ आहे, तो पूर्ण नाही. सर्व अहवाल हाती आल्यानंतरच यावर सविस्तर बोलणे योग्य ठरेल, असे सांगत त्यांनी संयमी पण महत्त्वाची भूमिका मांडली आहे.
यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी सातत्याने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत पुरावे मांडण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला शरद पवारांनी हा केवळ अपघात असल्याचे म्हटले होते, मात्र रोहित पवारांच्या दाव्यांनुसार, शरद पवारांचे विधान हे केवळ त्यावेळची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी होते. रोहित पवारांनी राज्यातील मविआतील नेत्यांसह राज ठाकरेंची भेट या संदर्भात संपूर्ण माहिती दिली. तर गेली 2 दिवस ते दिल्लीत असून दिल्लीतील विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेट अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी चर्चा करत त्यांनी हा मुद्दा संसदेत मांडावे अशी विनंती करत आहेत
Jay Pawar to Address Press Conference Tomorrow on Ajit Pawar Plane Crash
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेणार; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- Kalakar Katta : गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ वादात नवे वळण; वाहतूक अडथळ्याची अधिकृत नोंदच नाही
- उद्योगपती अनिल अंबानीच्या संबंधित कंपनीवर 15 ठिकाणी ईडीचे छापेमारी
- साेशल मीडियावर व्हायरल वक्तव्य प्रकरणी वसंत माेरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा