विशेष प्रतिनिधी
छञपती संभाजी नगर : Raksha Khadse क्रिकेटसह इतर अनेक खेळांमध्येही उज्वल भविष्य असून पालकांनी मुलांना विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.Raksha Khadse
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांमध्ये क्रीडाविषयी जागरूकता वाढावी आणि शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांना खेळांमध्ये अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने आयोजित ‘अस्मिता लीग’ चे उद्घाटन रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, देशाला 2036 पर्यंत विकसित भारत बनविण्याचे उद्दिष्ट आहे. तंत्रज्ञानासोबतच नागरिकांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. युवा पिढीने स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असून विविध खेळांच्या माध्यमातून युवक-युवतींना निरोगी ठेवता येते. तंदुरुस्त युवा पिढीमुळे देश विविध क्षेत्रात प्रगती करू शकतो.Raksha Khadse
खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून देशभरातील जिल्ह्यांमध्ये ‘अस्मिता लीग’चे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून महिलांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. क्रीडा क्षेत्रात खेळाडू म्हणूनच नव्हे तर प्रशिक्षक, व्यवस्थापन आणि इतर अनेक करिअरच्या संधीही उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंनाही अधिक संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा प्रकारात यश संपादन करणाऱ्या मुलींचा मंत्री खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा क्षेत्रात विविध सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले. स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या संचालिका डॉ. मोनिका घुगे यांनी महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे यासाठी संस्था मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याचे नमूद केले.
Bright Future in Cricket and Other Sports, Says Raksha Khadse
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेणार; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- Kalakar Katta : गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ वादात नवे वळण; वाहतूक अडथळ्याची अधिकृत नोंदच नाही
- उद्योगपती अनिल अंबानीच्या संबंधित कंपनीवर 15 ठिकाणी ईडीचे छापेमारी
- साेशल मीडियावर व्हायरल वक्तव्य प्रकरणी वसंत माेरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा