Chandrakant Patil : जूनपासून शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी

सांगली : Chandrakant Patil राज्यातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी जून महिन्यापासून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. या प्रशिक्षणामध्ये लाठी-काठी आणि कराटे यांसारख्या स्वसंरक्षणाच्या तंत्रांचा समावेश असणार आहे.Chandrakant Patil

सांगली येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कन्या सबलीकरण उपक्रमाअंतर्गत मोफत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात कराटे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवळपास एक हजार मुलींना यलो बेल्ट ग्रेडचे प्रमाणपत्र आणि बेल्ट यांचे वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.Chandrakant Patil



 

यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह विविध अधिकारी आणि मोठ्या संख्येने कराटे प्रशिक्षण घेतलेल्या मुली उपस्थित होत्या.

कार्यक्रमादरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या शिक्षणासाठी राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांचीही माहिती दिली. राज्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे पाच लाख मुलींना कॉलेज फी आणि होस्टेल फी माफ करण्यात आली असून, त्याशिवाय ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत दरमहा दोन हजार रुपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात खासदार विशाल पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत मुलींना दिले जाणारे स्वसंरक्षण प्रशिक्षण पाहून त्यांना स्वतःच्या मुलींची आठवण झाली, असे त्यांनी सांगितले. “मलाही दोन मुली आहेत. या मुलींचे कराटे प्रशिक्षण पाहून माझे म्हातारपण सुरक्षित जाईल,” असे म्हणताच कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये हास्याची लहर पसरली.

Self-Defense Training for Girls in Schools and Colleges from June, Announces Chandrakant Patil

महत्वाच्या बातम्या