Uddhav Thackeray : शरद पवार अडचणीत असताना उद्धव ठाकरेंकडून विरोध, भाजपचा निशाणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Uddhav Thackeray  उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मदतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण आज राज्यसभेच्या निवडणुकीत पवार अडचणीत असताना उद्धव यांनी सहकार्याऐवजी त्यांच्या विरोधाची भूमिका घेतली, अशी टीका भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधताना केली आहे.Uddhav Thackeray

राज्यातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 16 तारखेला निवडणूक होणार आहे. विद्यमान संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या वाट्याला 7 पैकी 1 जागा येण्याची शक्यता आहे. पण या जागेवर ठाकरे गटाने दावा ठोकला आहे. शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला, तर ठाकरे गट या जागेवरील दावा सोडेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण आता ठाकरे गटाने ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वरील शब्दांत टीका केली आहे.Uddhav Thackeray



केशव उपाध्ये म्हणाले, ज्या शरद पवारांच्या आग्रहावरून मविआचे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेच शरद पवार आज राज्यसभेच्या निवडणुकीत अडचणीत असताना उध्दव ठाकरे यांनी सहकार्याऐवजी विरोधाची भूमिका घेतली आहे. खरं तर ही उध्दव ठाकरे यांच्यासाठी परतफेडीची संधी होती. पण राजकारणात कृतज्ञतेपेक्षा स्वार्थ हाच मोठा ठरतो, याचंच हे उदाहरण म्हणावं लागेल.

मुख्यमंत्रीपदाच्या काळातील उद्धव ठाकरे यांच्या वर्तनाबाबतची नाराजी पवारांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केली होतीच; मात्र आता खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळी शरद पवार हे उध्दव ठाकरे यांच्या राजकीय शैलीचा आणखी एक अनुभव घेत असतील. राजकारणात मैत्री आणि वैर दोन्ही कायमस्वरूपी नसतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. सत्ता, समीकरणं आणि स्वार्थ यांच्या भोवऱ्यात जुने उपकार आणि संबंध किती लवकर विस्मृतीत जातात, याचं हे ताजं उदाहरण म्हणता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

BJP Targets Uddhav Thackeray for Opposing Sharad Pawar Amid Crisis

महत्वाच्या बातम्या