Anti-Encroachment : अतिक्रमण कारवाईस विराेध महागात, एमआयएमच्या 11 नगरसेवकांवर गुन्हे दाखल

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून अतिक्रमण कारवाईस विराेध करणाऱ्या एमआयएमच्या 11 नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाला कारवाई करण्यास मज्जाव करत त्यांनी हुसकावून लावले हाेते.

छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज भागात रस्त्यावर अतिक्रमण करत फळ विक्री करणाऱ्या काही विक्रेत्यांनी चार दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेसह तिच्या पतीला व दिराला जबर मारहाण केली होती. याशिवाय एका फळ विक्रेत्या महिलेलाही मारहाण झाली होती. Anti-Encroachment

त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल यांनी महापालिकेच्या आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडे शहागंज मधील फळ विक्रेत्यांचे व इतर व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण पथकाचे उपायुक्त वाहूळ यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली.ऐन रमजान महिन्यात अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई केल्यामुळे फळ विक्रेते व शहागंज भागातील व्यापारी संतापले होते. केवळ मुस्लिम फळ विक्रेते व व्यापाऱ्यांचीच अतिक्रमणे काढली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. Anti-Encroachment



निवडणुकीत मत मागण्यासाठी येणारे एमआयएमचे नगरसेवक आता कुठे आहेत? असा संताप काही विक्रेत्यांनी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरत अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच एमआयएमचे नगरसेवक शहागंज परिसरात रस्त्यावर आले आणि त्यांनी फळ विक्रेत्यांना पुन्हा गाड्या लावण्यास प्रवृत्त केले. याशिवाय गस्तीवर असलेल्या अतिक्रमण हटाव पथकाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत तिथून उसकावूनही लावले. Anti-Encroachment

एमआयएमचे विरोधी पक्षनेते अब्दुल साजिद समीर यांनी ‘अब प्रशासकराज नही है, गया वो डर प्रशासक का, महापालिका किसी के बाप की जागीर नही’ अशी भाषा वापरत फळ विक्रेत्यांना अतिक्रमण करण्यास प्रवृत्त केले होते. दरम्यान एमआयएमच्या या मुजोरीमुळे सत्ताधारी शिवसेनेमध्ये संतापाचे वातावरण होते. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेत बाधा आणणाऱ्या नगरसेवकांवर पद रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी आपण पत्र पाठवून आयुक्तांकडे करणार आहोत, असे म्हटले होते. Anti-Encroachment

महापालिकेच्या उपायुक्त सविता सोनवणे यांच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिसांनी 11 नगरसेवक आणि तीन नगरसेवकांच्या नातेवाईकांसह 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकांमध्ये एमआयएमचे विरोधी पक्ष नेते अब्दुल समीर साजिद, नगरसेवक सय्यद ओसामा अब्दुल कदीर, काकासाहेब दामोदर काकडे, अकील अहमद (नगरसेविका तरन्नू अखिल अहमद यांचे पती) फिरोज खान मोईन उद्दीन खान, मेराज खान जलील खान, मोहम्मद वाजेद जागीरदार, सोहेल कुरेशी, मुनशी पटेल, मोहम्मद वसीम अलीम, अहमद मतीन पटेल साबिर (नगरसेविका फर्जना गुलाम रसूल यांचे जावई), सलीम सहारा (नगरसेविका नर्गिस फातिमा यांचे पती), अमजत चाचू (नगरसेविका खान अल्मास यांचे वडील) यांच्यासह इतर तीस ते चाळीस जणांचा यात समावेश आहे. Anti-Encroachment

या महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 10 (1) ड प्रमाणे अतिक्रमण करणे, अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन देणे, अतिक्रमण कारवाईस विरोध अशी कृती केल्यास नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.

Opposition to Anti-Encroachment Drive Proves Costly; Cases Filed Against 11 All India Majlis-e-Ittehadul Muslimeen Corporators

महत्वाच्या बातम्या