विशेष प्रतिनिधी
लातूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता मोठी घडामोड समोर आली आहे. लातूरमधील प्रसिद्ध RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ताब्यात घेतल्याचे कळत आहे.गेल्या तीन दिवसांपासून सीबीआयकडून त्यांची चौकशी सुरू होती. त्याआधी काल जवळपास ११ तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली होती.
या चौकशीत नेमकी कोणती माहिती समोर आली, याबाबत अधिकृत खुलासा करण्यात आलेला नसला तरी, मोटेगावकर यांना ताब्यात घेतल्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. लातूरमधील निवृत्त प्राध्यापक एस. पी. कुलकर्णी यांचे नाव या प्रकरणातील मास्टरमाईंड म्हणून समोर आल्यानंतर सीबीआयचे पथक लातूरमध्ये आले होते. त्यानंतर शहरातील काही खासगी NEET कोचिंग क्लासेसची चौकशी सुरू करण्यात आली.
शिवराज मोटेगावकर यांच्या RCC कोचिंग क्लासेसच्या राज्यासह देशभरात अनेक शाखा असल्याची माहिती आहे. या प्रकरणात नांदेड कनेक्शनही समोर आल्याचे सांगितले जात असून, क्लासेसच्या माध्यमातून पेपरफुटी रॅकेटशी काही संबंध होता का, याचा सीबीआयकडून सखोल तपास केला जात आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे लातूरसह राज्यभरातील खासगी NEET कोचिंग क्लास चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सीबीआयच्या तपासातून आणखी कोणती नावे समोर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Major action in NEET paper leak case; Latur’s famous class director Shivraj Motegaonkar in CBI custody?
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा