विशेष प्रतिनिधी
मुंबई : पहिल्या भागाइतकाच वादग्रस्त ठरलेला द केरला स्टाेरी २ गाेज बियाॅंड या चित्रपटानेही बाॅक्स ऑफिसवर जलवा दाखविण्यास सुरूवात केली आहे. हा चित्रपट नियोजित तारखेलाच 27 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित झाला. केरळ उच्च न्यायालयाने प्रदर्शनावरील स्थगिती उठवल्यानंतर सायंकाळी परवानगी मिळाली आणि पहिल्याच दिवशी रात्रीपासून चित्रपटाचे शो सुरू झाले. चित्रपटाने पहिल्या आठवड्याच्या शेवटी समाधानकारक कमाई केली आहे.The Kerala Story 2
चित्रपटाने पहिल्या दिवशी 0.75 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. परवानगी उशिरा मिळाल्यामुळे पहिल्या दिवशी मर्यादित शो झाले, तरीही प्रेक्षकांची उत्सुकता कायम राहिली. दुसऱ्या दिवशी, म्हणजे शनिवारी, कमाईत मोठी झेप घेत चित्रपटाने 4.65 कोटी रुपयांची कमाई केली. रविवारी, म्हणजे तिसऱ्या दिवशी, विकेंडचा फायदा घेत चित्रपटाने 5 कोटी रुपयांची कमाई करत एकूण पहिल्या तीन दिवसांत 10.40 कोटी रुपयांचा टप्पा गाठला.The Kerala Story 2
चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी प्रेक्षकांची उपस्थिती शनिवारी आणि रविवारी वाढल्याचे दिसून आले. देशातील विविध भागांतील तीन हिंदू तरुणींच्या आयुष्याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्या मुस्लिम युवकांशी विवाह करण्याचा निर्णय घेतात आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा वेध या चित्रपटात घेतला आहे. ट्रेलरपासूनच या विषयावर मोठी चर्चा रंगली होती.The Kerala Story 2
चित्रपटात उल्का गुप्ता, अदिती भाटिया, ऐश्वर्या ओझा, सुमित गहलावत आणि अर्जन सिंह औजला यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे.The Kerala Story 2
निर्माते विपुल अमृतलाल शहा यांच्या ‘द केरला स्टोरी टू गोज बियॉन्ड ‘ या चित्रपटाभोवती रिलीजपूर्वीच मोठा वाद निर्माण झाला हाेता. दिल्लीतील पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या टीम आणि माध्यमांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. चित्रपटामुळे केरळची प्रतिमा डागाळली जात असल्याचा आरोप उपस्थित करण्यात आला हाेता.The Kerala Story 2
दिग्दर्शक कामाक्ष्या नारायण सिंग यांनीही भूमिका स्पष्ट करत म्हटले की, ही समस्या केवळ केरळपुरती मर्यादित नसून देशभरात विविध ठिकाणी दिसते. त्यामुळे व्यापक संदर्भ मांडण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे.The Kerala Story 2