विशेष प्रतिनिधी
मुंबई : दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी थेट संवाद साधला. प्रादेशिक तणाव आणि उड्डाणातील अनिश्चिततेमुळे हे पर्यटक दुबईत अडकले आहेत. Eknath Shinde
या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात शिंदे यांनी पर्यटकांची विचारपूस करत सर्वजण सुरक्षित आहेत का, अशी चौकशी केली. ठाणे, पुणे आणि अहिल्यानगर येथील एकूण 23 पर्यटक सध्या दुबई विमानतळावर अडकले असल्याची माहिती देण्यात आली. Eknath Shinde
संवादादरम्यान पर्यटकांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगितले की, प्रत्यक्षात परिस्थिती शांत आहे. सोशल मीडियावरील काही संदेशांमुळे अनावश्यक भीती निर्माण झाली आहे. गटासोबत असलेला एक रुग्ण स्थिर अवस्थेत असून त्याला आवश्यक वैद्यकीय मदत मिळत असल्याची माहितीही देण्यात आली.
काहींनी एका इमारतीजवळ ड्रोन दिसल्याच्या बातम्यांचा उल्लेख केला, मात्र स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. संबंधित यंत्रणांशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून पर्यटकांनी चिंता करू नये, असे त्यांनी आश्वासन दिले. Eknath Shinde
गरज भासल्यास पर्यटकांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच अडकलेल्या पर्यटकांचे संपर्क क्रमांक घेऊन अधिकाऱ्यांना सतत संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दुबईतील प्रवास स्थिती सुरळीत होईपर्यंत महाराष्ट्र शासन त्यांच्यासोबत उभे राहील, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली. Eknath Shinde
Deputy CM Eknath Shinde Holds Direct Conversation with Stranded Maharashtra Tourists in Dubai
महत्वाच्या बातम्या
- Israeli missile : इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले
- जागतिक स्तरावरील संस्थांची मदत घ्या पण शंकांचे निरसन करा, सुनील तटकरे यांची विमान अपघाताबाबत मागणी
- पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगला उपस्थित न राहिल्याने आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन
- Amol Mitkari : त्यांचे काका गेलेत, त्यामुळे स्टंट म्हणू नका, रोहित पवारांच्या मदतीला अमोल मिटकरी