विशेष प्रतिनिधी
मुंबई : Prakash Solanke जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत महिलांच्या सक्षमीकरणावर चर्चा सुरू असतानाच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एका गंभीर सामाजिक प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ग्रामीण भागात शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने परिस्थिती चिंताजनक बनली असून, अनेक ठिकाणी मुलांनाच हुंडा द्यावा लागत असल्याची बाब त्यांनी मांडली.Prakash Solanke
लक्षवेधी सूचनेद्वारे बोलताना सोळंके म्हणाले की, ग्रामीण भागात २५ ते ३० वयोगटातील अनेक तरुण लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक गावात किमान ५० ते १०० तरुण असे आहेत ज्यांचे वय उलटून गेले तरी त्यांचे लग्न होत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे हे तरुण शेतीचा व्यवसाय करतात आणि आजच्या परिस्थितीत शेती करणाऱ्या मुलाला मुलगी देण्यास अनेक कुटुंबे तयार नसतात.Prakash Solanke
या परिस्थितीचा फायदा घेत फसवणुकीची रॅकेट सक्रिय झाली असल्याचाही त्यांनी आरोप केला. काही ठिकाणी ‘बोगस’ मुली दाखवून विवाह लावून देण्याच्या नावाखाली तरुणांकडून अडीच ते तीन लाख रुपये उकळले जातात. इतकेच नव्हे तर एकाच मुलीचे चार-चार विवाह लावून अनेक तरुणांची फसवणूक केल्याच्या घटना घडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
लग्न होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक तरुण नैराश्याच्या गर्तेत जात असून काही जण व्यसनांच्या आहारीही जात आहेत, ही चिंताजनक बाब असल्याचे सोळंके यांनी नमूद केले. या समस्येवर सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात आणि अशा तरुणांच्या विवाहासाठी विशेष योजना किंवा मदत योजना सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावर उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सरकार या प्रश्नाची गंभीर दखल घेईल, असे सांगितले. आमदार सोळंके यांनी मांडलेली माहिती वास्तव परिस्थिती दर्शवते, असे नमूद करत या विषयाचा अभ्यास करून आवश्यक उपाययोजना आणि योजना तयार करण्याचा विचार केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.
Bride Shortage for Farming Youth in Rural Maharashtra; MLA Prakash Solanke Flags Marriage Fraud Rackets
महत्वाच्या बातम्या
- पिंकी माळीच्या कुटुंबाला व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही. के. सिंगकडून धमक्या, अमाेल मिटकरी यांचा आरोप
- निलंबित आयएएस अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी, निलंबन मागे घेण्याची शक्यता
- राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांवर ब्रेक, सरकारचा मोठा निर्णय
- पाकिस्तान जिंदाबादच्या घाेषणा, पाेलीसांच्या कारवाईनंतर भारत माता की जय म्हणत माफी