विशेष प्रतिनिधी
मुंबई : Shivendraraje तुम्ही खरेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील असाल आणि तुमचा स्वाभिमान भाजप च्या चरणी अर्पण केला नसेल तर कोश्यारी च्या पुरस्काराला विरोध करा. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सर्व संघ भाजप नेत्यांचा उघड उघड विरोध करा, असे आव्हान काँग्रेसतर्फेसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना देण्यात आले आहे.Shivendraraje
मला डिवचू नका, मी छत्रपतींची औलाद आहे. वेळ आली तर कोणालाच सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजे यांनी दिली होती. त्यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र काँग्रेसकडून ट्विट करत पलटवार करण्यात आला आहे.Shivendraraje
महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत म्हटलं आहे की,आ. शिवेंद्रराजे जी, आपल्यातील “छत्रपतींची औलाद” विकृत कोश्यारी ने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा जागी झाली असती, तर तमाम शिवप्रेमींना बरं वाटलं असतं. आपल्या राजांना शिव्या देणारा छिंदम, प्रशांत कोरटकर, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे म्हणणारा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, राजांच्या आग्रा मोहिमेचं असंबद्ध वर्णन करणारा राज्याचा मंत्री मंगलप्रसाद लोढा, महाराजांच्या पुण्यतिथीला ढोल वाजवणारा तत्कालीन मंत्री विनोद तावडे…या प्रत्येक घटना आणि वक्तव्यावेळी आपल्यातील “छत्रपतींची औलाद” जागी व्हायला हवी होती,
शिवप्रेमींनी आपल्याला डोक्यावर घेतलं असतं. आपल्या माहितीसाठी ही सगळी मंडळी भाजप व त्यांच्याशी संबंधित असलेल्या विचारांची आहेत. तुम्ही खरेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील असाल आणि तुमचा स्वाभिमान भाजप च्या चरणी अर्पण केला नसेल तर कोश्यारी च्या पुरस्काराला विरोध करा. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सर्व संघ भाजप नेत्यांचा उघड उघड विरोध करा.
Congress Leader Shivendraraje Challenged to Prove Lineage to Chhatrapati Shivaji Maharaj
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
- विमान अपघातप्रकरणी अजित पवार यांच्या खासगी सचिवांची सीआयडीकडून चार तास चौकशी
- Government identity : तृतीयपंथांना सरकारी “ओळख”;कोणत्या योजनांचा मिळणार लाभ?
- CM Devendra Fadnavis : विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प