विशेष प्रतिनिधी
वसई : Thackeray Brothers नालासोपारा परिसरात समाजमाध्यमांवरील एका आक्षेपार्ह व्हीडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. एका तरुणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपमानास्पद व अर्वाच्च भाषेत वक्तव्य केले होते. या व्यक्तव्याचा व्हिडिओ तयार करून त्याने तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. प्रसिद्धी आणि ‘व्ह्यूज’मिळवण्यासाठी केलेल्या या कृतीमुळे त्याच्यावर तीव्र टीका होत आहे.Thackeray Brothers
हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर आणि केवळ प्रसिद्धीसाठी ही मर्यादा ओलांडली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. मनसे पदाधिकारी किरण नकाशे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणाचा शोध घेत त्याला थेट त्याच्या राहत्या घरातून बाहेर काढले.Thackeray Brothers
त्यानंतर त्याला मारहाण करत त्याची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली. सूरज शिर्के असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर सूरज शिर्केने हात जोडून ठाकरे बंधूंची माफी मागितली. तरुणाच्या या कृतींमुळे राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप दिसून येत होता.
या प्रकरणावर मनसेच्या अधिकृत ‘मनसे रीपोर्ट’ या ट्विटर (एक्स) हॅंडलवरुन प्रतिक्रिया देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ व टीका करणाऱ्या व्यक्तीविरोधात कार्यकर्त्यांनी कारवाई केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ”एका मर्यादेपर्यंत टीका सहन केली जाऊ शकते, मात्र सातत्याने अपमानास्पद वक्तव्ये केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात,” असेही या ट्विटमध्ये नमूद आहे.
Derogatory and Obscene Remarks Against Thackeray Brothers Spark Row in Nalasopara
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : यूजीसीच्या वादग्रस्त नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
- दादा, तुम्ही आमच्यात नाहीत हे मन मान्यच करायला तयार नाही, प्रताप सरनाईक यांचे हृदयस्पर्शी पत्र
- सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची नरहरी झिरवळ मागणी
- दारू आणि नियमभंग, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमागे वैमानिकाचा धक्कादायक भूतकाळ