विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्यांचे संपूर्ण आयुष्य एका परिवाराच्या गुलामीत गेले, त्यांनी देशाला सार्वभौम कसे ठेवतात आणि देश कसा चालवतात, हे आम्हाला शिकवू नये, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे गुलाम आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली होती.
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्यांचे आयुष्य एका परिवाराच्या गुलामित गेले, त्यांना देश कसा चालवला जातो, देश कसा सार्वभौम ठेवतात याबाबत काहीही माहिती नाहीये. आज ज्याप्रकारे मोदींनी भारताची ऊर्जा इनसिक्योर केलीये, अन्यथा भारताची काय परिस्थिती असते हे आपण समजू शकतो. ज्यावेळी टॅरिफ वॉर झाला, भारत झुकला नाही. भारताने वेगवेगळ्या देशांशी टॅरिफ करार केले. ज्यामुळे टेरिफ वॉर करणाऱ्यांनाही मागे हटावे लागले. त्यामुळे एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी अशाप्रकारची टीका करणे हास्यास्पद आहे. devendra Fadanvis
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी गडचिरोलीचे लोखंड परदेशात पाठवून पुन्हा तिथूनच लोखंड विकत घेण्याचा घाट फडणवीसांनी घातल्याचा आरोप केला होता. यावर मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक झाले. “कुणी लॉजिकली बोलले तर माझ्या स्तराच्या माणसाने उत्तर दिले पाहिजे. पण कुणी ‘बिनडोकपणे’ बोलले आणि मी त्याला उत्तर दिले, तर मी देखील बिनडोक ठरेन.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, ही कर्जमाफी शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधक सरसकट कर्जमाफीसाठी आग्रही आहेत. या मागणीसाठी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन देखील केले. यावर फडणवीस म्हणाले, विरोधकांना आता तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. गिरा तो भी टांग उपर थी अशापद्धतीने विरोधकांचे चाललेले आहे. devendra Fadanvis
फडणवीस म्हणाले, जनता विरोधकांसोबत नाही, जनतेने मनपा, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांना जमीन दाखवलेली आहे. आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी नाही, तर निवडणुका जिंकल्यानंतर कर्जमाफी केली आहे. त्यामुळे जनतेला आमच्यावर विश्वास आहे. विरोधकांनी कितीही आंदोलने केली, तरी जनता त्यांच्यासोबत नाही. devendra Fadanvis
देशात कमी तेलसाठा असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी कालही आवाहन केले आणि आजही करतो आहे. केंद्र सरकार तेल, गॅस सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरीही कुठेही तुटवडा पडू नये म्हणून सर्वप्रकारच्या उपाययोजना चाललेल्या आहेत. devendra Fadanvis
कोणीही अफवा पसरवू नये, कुणीही अफवेवर विश्वास ठेवू नये. अफवेवर विश्वास ठेवून साठे करण्यास आपण सुरुवात केली, तर परिस्थिती खराब होईल. त्यातून मागणी आणि पुरवठा हे सुत्र गडबडेल. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की, कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. माध्यमांना विनंती आहे की, नवनवीन गोष्टी ज्या कुठेही त्याचा पुरावा नाही, अशी गोष्टी दाखवून लोकांना पॅनिक करू नका. केंद्र सरकार यासंदर्भात उचित काळजी घेत आहे. devendra Fadanvis