Ashish shelar : पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आर्थिक विकास महामंडळ लवकरच स्थापन होणार, आशिष शेलार यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ashish shelar  पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ पुढील अधिवेशनापूर्वी स्थापन करण्यात येईल, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. पत्रकारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी पत्रकार संघटना, शासनातील विभाग आणि लोकप्रतिनिधी यांची व्यापक बैठकही लवकरच आयोजित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.Ashish shelar

विधान परिषदेत सदस्य श्रीकांत भारतीय यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत संजय खोडके आणि शशिकांत शिंदे यांनीही सहभाग घेतला. पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर करण्यात आलेले आर्थिक विकास महामंडळ कधी स्थापन होणार, तसेच कोरोनानंतर वृत्तपत्र क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आणि रोजगाराच्या प्रश्नाकडे सदस्यांनी लक्ष वेधले.Ashish shelar



यासोबतच आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान निवृत्ती वेतन योजनेतील प्रलंबित प्रस्ताव, वृत्तपत्र खरेदी करणाऱ्या वाचकांना प्राप्तिकर सवलत, पत्रकारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत, पत्रकारांसाठी गृहनिर्माण योजना आणि वृत्तपत्रांवरील जाहिरातींवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी यांसारख्या मुद्द्यांवरही चर्चा झाली.

मंत्री शेलार यांनी सांगितले की, १० ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्रिमंडळाने पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात विविध खात्यांशी समन्वयाची प्रक्रिया सुरू असून पुढील अधिवेशनापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करून महामंडळे स्थापन करण्यात येतील.

दरम्यान, पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी आणि वसंत मुंडे यांच्या समितीने केलेल्या शिफारशींवरही शासन कार्यवाही करत आहे.

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोहे यांनीही महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ अनेक पात्र पत्रकारांना मिळत नाही, कारण त्यांनी काम केलेली वृत्तपत्रे बंद पडलेली असतात किंवा आवश्यक प्रमाणपत्रे मिळवणे कठीण होते. त्यामुळे अशा प्रकरणांची सत्यता पडताळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.

जिल्हा स्तरावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला अधिक अधिकार देऊन कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Government to Establish Economic Development Corporation for Journalists and Newspaper Vendors

महत्वाच्या बातम्या