Harshvardhan Sapkal : आघाडीच्या राजकारणात दोन पावलं मागे, हर्षवर्धन सपकाळ यांची कबुली

विशेष प्रतिनिधी

धाराशिव : Harshvardhan Sapkal राज्यात आणि केंद्रात 1999 नंतर आघाडीचे राजकारण सुरु झालेले आहे. आघाडीच्या राजकारणात दोन पावलं मागे घ्यावी लागतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. जेथे शक्य आहे तेथे आघाडी करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना दिले होते. नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळेल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.Harshvardhan Sapkal

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी धाराशिवच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते, ते म्हणाले की, एकीकडे भाजपा व एमआयएम धार्मिक द्वेष पसरवत आहेत तर दुसरीकडे निवडणूक आयोग, पैसा, हिंदु , प्रशासकीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात आला. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या हातातील कठपुतली बाहुली बनलेलेही राज्याने पाहिले आहे.Harshvardhan Sapkal



स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसला यश

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लोकशाहीची पायमल्ली करण्यात आली. या परिस्थितीत आम्ही वंचित बहुजन आघाडी, रासप, ओबीसी बहुजन आघाडी हे नवे मित्र पक्ष जोडले आहेत. कार्यकर्त्यांना संधी दिली व जनतेने मोठा विश्वास दाखवत काँग्रेसला राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष बनवले. नगरपालिकेत 41 नगराध्यक्ष, 1006 नगरसेवक तर महानगरपालिकेत 350 नगरसेक निवडून आले, तीन महानगरपालिकेत काँग्रेसचे महापौर होत आहेत असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या लोकनेत्याचे अकाली निधन मनाला चटका लावून गेले. विमान अपघातात झालेल्या निधनाने संशयाचे ढग निर्माण झाले आहेत, या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. जर संशय व्यक्त केला जात असेल तर सखोल चौकशी करून संशय दूर झाला पाहिजे.

यावेळी उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार व प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते धीरज देशमुख, धाराशिवचे जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Harshvardhan Sapkal Admits Taking Two Steps Back in Alliance Politics

महत्वाच्या बातम्या