विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल व्हिलन कसे होऊ शकतात? त्यांना का टार्गेट केले जाते?” असा सवाल त्यांनी केला.
मुश्रीफ म्हणाले की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पक्षात अनेक वर्षांपासून जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. “प्रफुल पटेल शरद पवारांच्या काळापासून कार्याध्यक्ष आहेत आणि पुढे राष्ट्रीय अध्यक्षपदात बदल झाला तरी त्यांची भूमिका कायम राहणार आहे. तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत. आमदारांची बैठक बोलावणे ही त्यांची जबाबदारीच आहे. मग त्यात चूक काय?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. Hasan Mushrif
रोहित पवार यांनी २८ जानेवारी रोजी मुंबई आणि दिल्ली येथे झालेल्या अजित यांच्या विमान अपघाताबाबत काही शंका उपस्थित केल्या होत्या. त्यावर प्रतिक्रिया देताना मुश्रीफ म्हणाले, “सखोल अभ्यास करून त्यांनी प्रेझेंटेशन दिले आहे. शंका उपस्थित झाल्या असतील तर त्याची चौकशी होईल. मुख्यमंत्री या विषयाकडे गांभीर्याने पाहत आहेत.”
तथापि, रोहित पवारांना सल्ला देताना ते म्हटले, “चुलत्यांचा अपघात झाल्यामुळे त्यांना दुःख झाले आहे, ते आम्हालाही झाले आहे. पण पक्षाच्या अंतर्गत बाबींमध्ये त्यांनी अनावश्यक हस्तक्षेप करू नये.” Hasan Mushrif
विलीनीकरणाच्या चर्चांवर बोलताना मुश्रीफ यांनी सांगितले की हा मुद्दा अनेकदा चर्चेत आला होता. “अजितदादा चर्चा करत होते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता त्या चर्चेत नव्हता. दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. आता भाजपाला विश्वासात घ्यावे लागेल. अंतिम निर्णय सुनेत्रा वहिनी आणि कुटुंब घेतील,” असे ते म्हणाले.
“How Are Tatkare and Patel Villains?” Hasan Mushrif Questions Rohit Pawar
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये, नवनाथ बन यांचा घणाघात
- पुणे महापालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश ; ‘विशेष नियोजन प्राधिकरण’रद्द
- Shiv Sena : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? 18 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- Ajitdada Pawar : अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान’ राबविणार, राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार