विशेष प्रतिनिधी
मुंबई : Land Revenue महाराष्ट्र विधानसभेत जमीन वापराबाबत महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेल्या या विधेयकामुळे राज्याच्या जमीन महसूल नियमांमध्ये काळानुरूप बदल करण्यात येणार असून प्रशासकीय प्रक्रियेतील अनेक अडथळे दूर होण्याची शक्यता आहे.Land Revenue
या सुधारणा विधेयकामुळे राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतील मोठ्या प्रमाणावरील गायरान जमिनींचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आता या जमिनी सार्वजनिक हिताच्या विविध विकासकामांसाठी वापरण्याचा मार्ग कायदेशीररीत्या खुला झाला आहे. नागरी भागातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक सुविधांची गरज लक्षात घेता या निर्णयामुळे विकास प्रकल्पांना गती मिळणार आहे.Land Revenue
सरकारच्या निर्णयानुसार नागरी भागातील हजारो हेक्टर गायरान जमीन सार्वजनिक प्रकल्पांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे ७,७०० हेक्टर, नगरपालिका क्षेत्रातील सुमारे ४,००० हेक्टर आणि नगर परिषद क्षेत्रातील सुमारे ३,००० हेक्टर जमीन विकासकामांसाठी खुली होणार आहे.
या जमिनींची मालकी शासनाकडेच कायम राहणार असली तरी राज्य सरकारची पूर्वपरवानगी घेऊन महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषदांना त्या केवळ सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांसाठी वापरण्याची मुभा दिली जाणार आहे. या जमिनींचा वापर कोणत्याही व्यावसायिक कारणांसाठी करण्यास सरकारने सक्त मनाई केली आहे.
नव्या नियमानुसार गायरान जमीन जिल्हाधिकारी जमिनी म्हणून नोंदवली जाणार असून तिच्या वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असेल. तसेच जमिनीची मोजणी करून अधिकृत नोंद केली जाईल आणि अतिक्रमणे हटवून जमीन शासनाच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
महसूल मंत्री बावनकुळे यांच्या मते, या सुधारणेमुळे नागरी भागातील अनेक प्रलंबित विकासकामांना गती मिळेल आणि सार्वजनिक सुविधांच्या उभारणीसाठी उपलब्ध जमिनीचा प्रभावी वापर करता येईल.
Maharashtra Assembly Passes Land Revenue Amendment Bill; Thousands of Hectares of ‘Gairan’ Land Open for Public Projects
महत्वाच्या बातम्या
- पिंकी माळीच्या कुटुंबाला व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही. के. सिंगकडून धमक्या, अमाेल मिटकरी यांचा आरोप
- निलंबित आयएएस अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी, निलंबन मागे घेण्याची शक्यता
- राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांवर ब्रेक, सरकारचा मोठा निर्णय
- पाकिस्तान जिंदाबादच्या घाेषणा, पाेलीसांच्या कारवाईनंतर भारत माता की जय म्हणत माफी