Police Recruitment : नवी मुंबई पोलीस भरतीत गैरप्रकार; इंजेक्शन घेऊन आलेल्या चार उमेदवारांवर गुन्हा

विशेष प्रतिनिधी

मुंबई :Police Recruitment  नवी मुंबई पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेदरम्यान गैरप्रकाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शारीरिक चाचणीदरम्यान उत्तेजना वाढवण्यासाठी इंजेक्शन सोबत आणलेल्या चार उमेदवारांविरुद्ध कलंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Police Recruitment

कलंबोली येथे सध्या नवी मुंबई पोलीस दलाची भरती प्रक्रिया सुरू आहे. रविवारी उमेदवारांची शारीरिक परीक्षा घेतली जात होती. यावेळी चार उमेदवारांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांची तपासणी केली.Police Recruitment



तपासणीदरम्यान त्यांच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवून ठेवलेली इंजेक्शने पोलिसांना आढळून आली. शारीरिक चाचणीत कामगिरी सुधारण्यासाठी आणि उत्तेजना वाढवण्यासाठी ही इंजेक्शने वापरण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

या प्रकरणी पोलिसांनी आकाश पानसरे, सुयोग होले, सुनील कडुसकर आणि संकेत डोंगरे या चार उमेदवारांविरुद्ध कलंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Malpractice in Navi Mumbai Police Recruitment; Case Filed Against Four Candidates

महत्वाच्या बातम्या