विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manisha Patankar-Mhaiskar ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची गृह खात्याच्या अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉ. इकबाल सिंह चहल हे 31 जानेवारी 2026 रोजी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे मनिषा पाटणकर-म्हैसकर यांचा सध्याचा कार्यभार त्यांच्या पतीकडेच देण्यात आला आहे.Manisha Patankar-Mhaiskar
सुजाता सौनिक निवृत्त झाल्यानंतर इकबाल सिंह चहल यांची गृह विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी सुजाता सौनिक यांच्याकडून नवीन पदाचा कारभार त्वरित स्वीकारावा, असे आदेशदेखील देण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे पुढील आदेश येईपर्यंत इकबाल सिंह चहल यांच्याकडे खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभारदेखील सोपवण्यात आला होता. मात्र आता इकबाल सिंह चहल 31 जानेवारी 2026 रोजी निवृत्त होत आहेत. याचपार्श्वभूमीवर मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची गृह खात्याच्या अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.Manisha Patankar-Mhaiskar
मनिषा पाटणकर-म्हैसकर सध्या मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागात अपर मुख्य सचिव म्हणून काम करत होत्या. त्यामुळे आता मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची मंत्रालयातील गृह विभागात अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांच्या जागी त्यांचे पती मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागात अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिलिंद म्हैसकर यांच्या आपल्या पदाचा कार्यभार सोपवून नवीन पदाचा कार्यभार डॉ. इकबाल चहल यांच्याकडून स्वीकारावा असे निर्देश सह सचिव सुभाष उमराणीकर यांनी दिले आहेत.
1971 तुकडीच्या निवृत्त आयएएस अधिकारी असलेल्या चित्कला झुत्शी यांनी यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी 2007-08 च्या सुमारास गृह आणि वित्त विभागात ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. तसेच त्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या (MWRRA) सदस्य म्हणूनही कार्यरत होत्या. त्यानंतर 1973 तुकडीच्या आयएएस अधिकारी चंद्र अय्यंगार यांनी 31 मार्च 2009 रोजी महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला होता. 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी मावळत्या अधिकारी चित्कला झुत्शी यांच्याकडून हे पदभार स्वीकारले होते.
Manisha Patankar-Mhaiskar Appointed as Additional Chief Secretary of Home Department
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : यूजीसीच्या वादग्रस्त नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
- दादा, तुम्ही आमच्यात नाहीत हे मन मान्यच करायला तयार नाही, प्रताप सरनाईक यांचे हृदयस्पर्शी पत्र
- सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची नरहरी झिरवळ मागणी
- दारू आणि नियमभंग, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमागे वैमानिकाचा धक्कादायक भूतकाळ