विशेष प्रतिनिधी
बीड : Manoj Jarange बड्या नेत्याचे नाव नसल्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चार्जशीटवर म्हणून जरांगे पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे.संतोष देशमुख यांच्या प्रकरणात सीआयडीनं चार्ज शीट दाखल केलं. मात्र उज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी चार्जशीट दाखल करण्यात आलं, यामध्ये बड्या नेत्याचं नाव आलं नाही, त्यामुळे शंका आहे, अशी असे जरांगे म्हणाले. Manoj Jarange
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. राठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारकडून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता, तसेच एसआयटीची देखील स्थापना करण्यात आली होती. अखेर सीआयडीकडून आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. मात्र या आरोप पत्रावर प्रतिक्रिया देताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे. Manoj Jarange
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना ते म्हणाले , राहिले काय आणि नाही राहिले काय, काही फरक पडत नाही. मी अशांना मोजत नाही. पार कार्यक्रम लावून टाकला आहे. आता बाकीच्यांना खडी फोडायला जावं लागेल. मुंडे मंत्री असो किंवा नसो काही फरक पडत नाही. आपले नीट नाहीत, राजकीय अजेंडा चालवतात.
तब्येतीबाबत माहिती देताना ते म्हणाले,15 दिवसांपासून अंग दुखत आहे, डोळ्यांना अंधाऱ्या आल्या सारख झालं होतं. प्रवास खूप झाला म्हणून तब्येत बिघडली.Manoj Jarange
No big leader’s name, Manoj Jarange’s suspicion as on the charge sheet of Santosh Deshmukh murder case
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल