राज ठाकरे – एकनाथ शिंदे भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.Raj Thackeray–Eknath Shinde

एकनाथ शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देत राज ठाकरे यांचं स्वागत केलं. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चाही झाली. मात्र ही भेट राजकीय होती की सदिच्छा भेट होती. याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. गेल्या महिन्यात झालेल्या मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची युती विरुद्ध भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची महायुती अशी लढत झाली होती.Raj Thackeray–Eknath Shinde



प्रचारादरम्यान, राज ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली होती. मात्र पालिका निवडणुका आटोपल्यानंतर मनसेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदेसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. तसेच राज ठाकरे यांनीही लवचिक भूमिका घेण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर आज राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पहिल्यांदाच भेट झाली आहे. तसेच या भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचे शिंदेसेनेकडून सांगण्यात आले आहे. मात्र या भेटीमधील चर्चेचे अधिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. एकीकडे पालिका निवडणुकीमध्ये उद्धवसेना आणि मनसे हे ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र आल्यानंतर ही युती एकत्र राहण्यासाठीच झाली आहे, असेही सांगण्यात येत होते. Raj Thackeray–Eknath Shinde

मात्र असं असतानाही उद्धवसेनेचा कट्टर विरोधक असलेली शिंदेसेना आणि एकनाथ शिंदे यांच्याशी मनसे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या होत असलेल्या जवळीकीबाबत उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गट काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.Raj Thackeray–Eknath Shinde

Raj Thackeray–Eknath Shinde Meeting Sparks Buzz in Political Circles

महत्वाच्या बातम्या