विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका राजकारणात मोठी आणि निर्णायक घडामोड घडली. शहराच्या नेतृत्वाच्या शिखरावर कोण विराजमान होणार, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले असतानाच प्रभाग १३२ च्या नगरसेविका आणि भाजप महिला मोर्चा संयोजिका रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. तर उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. Ritu Tawade
महापालिकेतील भाजप पक्ष कार्यालयात पार पडलेल्या नगरसेवकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नगरसेविका रितू तावडे यांचे नाव महापौर पदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केले. तावडे यांच्या नावाची घोषणा करताच उपस्थित नगरसेवकांनी जोरदार टाळ्या वाजवत पक्षाच्या या निर्णयाचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. भाजपच्या या पहिल्या महिला महापौर असून केल्याने राजकीय वर्तुळात उत्साहाची लाट निर्माण केली. या घोषणेमुळे सहकारी नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.Ritu Tawade
घोषणेनंतर तावडे यांनी पक्षाने सोपवलेली जबाबदारी विश्वासाने पेलण्यासाठी पुढे पक्षाचा विश्वास अधिक दृढ करण्याचां निर्धार व्यक्त करत जय श्रीराम…भारत माता की जय… वंदे मातरम्… डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो.. भारतीय जनता पार्टीचा… देवा भाऊ आहे बढो .. अमित साटम आगे बढो.. या घोषणांच्या गजरात आपला उमेदवारी अर्ज महापालिका सचिव मंजिरी देशपांडे यांच्याकडे अधिकृतपणे सादर केला. याप्रसंगी महापालिका गटनेते गणेश खणकर, उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा..माजी खासदार मनोज कोटक.ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे, शिवसेनेचे गटनेते अमेय घोले, तसेच महायुतीचे नगरसेवक उपस्थित होते. Ritu Tawade
महापौर पदासाठी ही उमेदवारी ही मुंबईच्या विकासाच्या आणि सक्षम नेतृत्वाच्या दृष्टीने महत्त्वाची महत्वाची मानली जात असून सातम यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानत त्यांच्या विश्वास मुंबईच्या विकासाचा रथ जलदगतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करत सार्थ ठरवेन अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
दरम्यान, उपमहापौर पदासाठीही एक महत्त्वपूर्ण नाव पुढे आले असून दहिसरमधील नगरसेवक संजय घाडी यांची शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. पक्षाचे सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी घाडी यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, हा कालावधी अडीच वर्षाऐवजी सेवा वर्षांचा असेल असे जाहीर केले. त्यानंतर महायुतीच्या सर्व नगरसेवकांसोबत जात त्यांनी उपमहापौर पदाचा आपला उमेदवारी अर्ज महापालिका सचिव मंजिरी देशपांडे यांच्याकडे सादर केला. Ritu Tawade
Ritu Tawade Named Mayoral Candidate, Sanjay Ghadigaonkar Picked for Deputy Mayor’s Post in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक