विशेष प्रतिनिधी
मुंबई : Budget Session महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्य धक्क्यातून सावरलेले नाही. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, येत्या २३ फेब्रुवारीपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. मात्र, दरवर्षी आपल्या आक्रमक शैलीत राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे ‘दादा’ यंदा नसतील, या विचारानेच राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.Budget Session
अजित पवार यांच्याकडे राज्याचे अर्थ व नियोजन खाते होते. परंपरेनुसार, तेच यंदाचा अर्थसंकल्प मांडणार होते. त्यांच्या निधनानंतर आता ही महत्त्वपूर्ण जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार, याबाबत तर्कवितर्वांना उधाण आले आहे. तांत्रिकदृष्ट्या, मंत्र्याच्या निधनानंतर त्यांच्याकडील खाती आपोआप मुख्यमंत्र्यांकडे वळती होतात. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची दाट शक्यता आहे. फडणवीस यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असल्याने ते ही धुरा सांभाळू शकतात.Budget Session
दुसरीकडे, महायुतीमधील समतोल राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याकडे ही जबाबदारी दिली जाऊ शकते. यामध्ये छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांसारख्या अनुभवी नेत्यांची फळी आहे. भुजबळ यांनी यापूर्वी अनेकदा महत्त्वाची खाती सांभाळली आहेत, तर मुश्रीफ यांनाही प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री या दोन ज्येष्ठ नेत्यांपैकी एकावर विश्वास टाकू शकतात.
अजित पवार यांच्या जाण्याने रिक्त झालेले मंत्रिपद आणि बारामतीचे नेतृत्व यावरही चर्चा भविष्यात राजकीय निर्णय घेतला जाईल. मंत्रिमंडळात त्यांच्या कुटुंबातील सदस्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार किंवा पुत्र पार्थ पवार यांच्या नावांची चर्चा असली, तरी ही प्रक्रिया लगेच पार पडण्याची शक्यता कमी आहे. सध्यातरी, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे आर्थिक गाडा कोण हाकणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष लागले आहे.
Who Will Present the Budget? Senior Minister to Shoulder Responsibility in Budget Session
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : यूजीसीच्या वादग्रस्त नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
- दादा, तुम्ही आमच्यात नाहीत हे मन मान्यच करायला तयार नाही, प्रताप सरनाईक यांचे हृदयस्पर्शी पत्र
- सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची नरहरी झिरवळ मागणी
- दारू आणि नियमभंग, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमागे वैमानिकाचा धक्कादायक भूतकाळ