विशेष प्रतिनिधी
मुंबई; देशाच्या राजकारणात शरद पवार यांचा अनुभव आणि दृष्टी महत्त्वाची आहे. शरद पवार साहेबांनी संसदेत असणं गरजेचं आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांना कोणाकडेही हात पसरण्याची गरज नाही, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या राज्यसभेवरील खासदारकीची मुदत दोन एप्रिल रोजी संपत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी पुरेशी मते नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाशी हातमिळवणी करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, आमच्याकडे पवार साहेबांना निवडून आणण्याइतकी मतं आहेत. महाविकास आघाडीकडे त्यांना निवडून आणण्याइतपत संख्याबळ आहे.शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने दिल्लीत असणे म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज दिल्लीत असणे असे आहे, हे त्यांना म्हणालो होतो. शरद पवारांनी निवडणूक लढायचे असे ठरवले तर आमच्याकडे त्यांना निवडून आणण्याची ताकद आहे. महाविकास आघाडीकडे तेवढी मते जरूर आहेत. त्यामुळे शरद पवार यांना कुणापुढे हात पसरण्याची गरज नाही.
राऊत म्हणाले की, एप्रिलमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदार निवृत्त झाले तरी एक खासदार निवडून जाईल. निवडणूक बिनविरोध करायची की नाही हे सरकारने ठरवावे. पण शरद पवार यांनी संसदेत असावे. शरद पवारांची लढण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. शरद पवार यांनी निवडणूक लढावी ही आमची इच्छा आहेशरद पवार यांनी निवडणूक लढावी ही आमची इच्छा आहे. आघाडी म्हणून आमच्याकडे मतांपेक्षा जास्त कोटा आहे. इतरांनी कितीही अपशकून केला, विशेषत: दिल्लीतून अपशकून झाला तरी तो यशस्वी होणार नाही.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील मुख्य राष्ट्रवादी पार्टी ही महाविकास आघाडीचा घटक आहे. बाकी हवाबाजी आहे. शरद पवारांसारखा नेता दिल्लीत असणे गरजेचे आहे. मी शरद पवारांशी या विषयी अनेकदा बोललो आहे. आमच्या दोघांची चर्चा झाली आहे. एकदा तर उद्धव ठाकरे यांच्यासमोरच बोललो होतो. आता थांबायला पाहिजे अशी शरद पवारांची मानसिकता आहे, असे राऊत म्हणाले.दरम्यान, रोहित पवार हे पवार कुटुंबातील महत्त्वाचे घटक आहेत. रहस्य शोधण्याची त्यांच्यात क्षमता आहे. सतत माहिती येत असते त्यात रोहित पवार आहेत. रोहित पवार काही माहिती देत असतील तर महाराष्ट्र ऐकण्यास उत्सुक आहे. आम्ही दादा प्रेमी आहोत. मी याबाबत स्वत: रोहित पवारांशी बोलणार आहे. मी स्वत: दादांच्या जाण्याने अस्वस्थ आहे, असे राऊत म्हणाले.
शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने दिल्लीत असणे म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज दिल्लीत असणे असे आहे, हे त्यांना म्हणालो होतो. शरद पवारांनी निवडणूक लढायचे असे ठरवले तर आमच्याकडे त्यांना निवडून आणण्याची ताकद आहे. महाविकास आघाडीकडे तेवढी मते जरूर आहेत. त्यामुळे शरद पवार यांना कुणापुढे हात पसरण्याची गरज नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, एप्रिलमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदार निवृत्त झाले तरी एक खासदार निवडून जाईल. निवडणूक बिनविरोध करायची की नाही हे सरकारने ठरवावे. पण शरद पवार यांनी संसदेत असावे. शरद पवारांची लढण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असेही संजय राऊतांनी स्पष्टपणे सांगितले.शरद पवार यांनी निवडणूक लढावी ही आमची इच्छा आहेशरद पवार यांनी निवडणूक लढावी ही आमची इच्छा आहे. आघाडी म्हणून आमच्याकडे मतांपेक्षा जास्त कोटा आहे. इतरांनी कितीही अपशकून केला, विशेषत: दिल्लीतून अपशकून झाला तरी तो यशस्वी होणार नाही, असा दावा संजय राऊतांनी केला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील मुख्य राष्ट्रवादी पार्टी ही महाविकास आघाडीचा घटक आहे. बाकी हवाबाजी आहे. शरद पवारांसारखा नेता दिल्लीत असणे गरजेचे आहे. मी शरद पवारांशी या विषयी अनेकदा बोललो आहे. आमच्या दोघांची चर्चा झाली आहे. एकदा तर उद्धव ठाकरे यांच्यासमोरच बोललो होतो. आता थांबायला पाहिजे अशी शरद पवारांची मानसिकता आहे, असे राऊत म्हणाले.दरम्यान, रोहित पवार हे पवार कुटुंबातील महत्त्वाचे घटक आहेत. रहस्य शोधण्याची त्यांच्यात क्षमता आहे. सतत माहिती येत असते त्यात रोहित पवार आहेत. रोहित पवार काही माहिती देत असतील तर महाराष्ट्र ऐकण्यास उत्सुक आहे. आम्ही दादा प्रेमी आहोत. मी याबाबत स्वत: रोहित पवारांशी बोलणार आहे. मी स्वत: दादांच्या जाण्याने अस्वस्थ आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
Sharad Pawar Will Never Have to Beg, Sanjay Raut Gives Big Assurance
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक