विशेष प्रतिनिधी
मुंबई : Shiv Sena भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिका महापौर पदासाठी मराठी उमेदवार दिला आहे. मराठी महिला महापौराला अपशकून करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने (ठाकरे) घेतली आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर निवडणूक लढवायची नाही अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली आहे.Shiv Sena
मुंबई महापालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठी शनिवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्याआधी भाजप आणि शिवसेनेने (शिंदे) नगरसेवकांची बैठक आयोजित करुन दोन्ही पदांसाठीच्या उमेदवारांची घोषणा केली. दोन्ही पदांसाठी भाजप आणि शिवसेनेने (शिंदे) मराठी उमेदवार घोषित केल्यामुळे शिवसेनेने (ठाकरे) या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे महपौर पदी रितू तावडे आणि उपमहापौर पदी संजय शंकर घाडी यांची निवड बिनविरोध होत आहे.Shiv Sena
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे. भाजपने आज महापौर पदासाठी घाटकोपर भागातील रितू तावडे यांना उमेदवारी जाहीर केली. तर शिवसेनेने (शिंदे) संजय शंकर घाडी यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेने (शिंदे) उपमहापौर पदासाठी सव्वा वर्षांचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. महापालिकेतील दोन्ही पदांवर सत्ताधाऱ्यांनी मराठी उमेदवार दिल्यामुळे, भाजपच्या पहिल्या मराठी महिला महापौरांना अपशकून करणार नाही, अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली असल्याचे गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
शिवसेनेने (ठाकरे) मनसेसोबत युती करत मुंबई महापालिकेत 65 जागा जिंकल्या आहेत, तर मनसेचे 6 नगरसेवक सभागृहात असणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेची तब्बल 25 वर्षे महापालिकेत सत्ता होती. त्यांच्या काळात भ्रष्टाचार बोकाळला होता, तो उखडून फेकायचा आहे, असे भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांचा महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर म्हटले आहे. महापौर रितू तावडे या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव आणि विशाखा राऊत या सभागृहात असणार आहेत. महापालिकेच्या कारभाराची खडानखडा माहिती असलेले हे चार माजी महापौर विरोधी बाकांवर असणार आहेत. त्यामुळे महापौर रितू तावडे यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर त्यांची करडी नजर असणार आहे. त्यांच्या प्रश्नांचा सामना त्यांना करावा लागेल. याशिवाय काँग्रेसचे 24 आणि एमआयएमचे 8 नगरसेवक असा तगडा विरोधी पक्ष महापालिकेत असणार आहे. त्यांच्या टीकेला आणि प्रश्नांना महापौर रितू तावडे पुढील पाच वर्षे कशा समोरे जातात हे पाहाणे आता महत्त्वाचे राहणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मराठी-अमराठी वाद पेटला होता. भारतीय जनता पक्षावर विरोधकांकडून अ-मराठी महापौर बसवला जाईल असा आरोप केला जात होता. मुंबई महापालिकेचे महापौर पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर महापौर पदासाठी अनेक नावे चर्चेत होती. त्यात अखेर रितू तावडे यांनी बाजी मारली आहे. मुंबईची सेवक म्हणून मी काम करेल असे त्यांनी त्यांच्या निवडीनंतर सांगितले आहे.
रितू तावडे या घाटकोपर या गुजराती बहुल भागातून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. महापालिकेत काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. प्रथम त्या 2017 मध्ये विजयी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची ही नगरसेवकपदाची दुसरी टर्म आहे. नगरसेवकपदाच्या पहिल्याच कार्यकाळात त्या शिक्षण समिती अध्यक्ष, मुंबई उपनगरे स्थापत्य समितीच्या उपाध्यक्ष होत्या. याशिवाय महाराष्ट्र सरकारच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक, भारत सरकारच्या खादी ग्रामोद्योग प्रोफेशनल ट्रेनिंग असोसिएटच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.
Shiv Sena (Thackeray Faction) Backs Marathi Woman Mayor, Pulls Out of Mayoral Race
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
- विमान अपघातप्रकरणी अजित पवार यांच्या खासगी सचिवांची सीआयडीकडून चार तास चौकशी
- Government identity : तृतीयपंथांना सरकारी “ओळख”;कोणत्या योजनांचा मिळणार लाभ?
- CM Devendra Fadnavis : विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प