विशेष प्रतिनिधी
मुंबई: Aaditya Thackeray देशाच्या संसदेत प्रश्न मांडायचा नाही तर मग कुठे मांडायचा, संसदेत खासदारांनाच बोलू देत नाहीत, आपल्याच संसदेत बोलू दिले जात नाही. आपण आपल्या संसदेत विषय मांडायचा नाही मग पाकिस्तानच्या संसदेत जाऊन मांडायचा का? की चीनच्या संसदेत जाऊन हा विषय मांडायचा? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.Aaditya Thackeray
संसदेत झालेल्या गदारोळावर आदित्य ठाकरे म्हणाले, देशाच्या संसदेत बोलू देत नाहीत. आपल्याच संसदेत बोलू दिले जात नाही. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकात काय लिहिले आहे, वस्ताव काय होते? ते समोर यायला पाहिजे. हे सरकार राहुल गांधींना का घाबरत आहे? भारत आणि चीनच्या सीमारेषांसंदर्भातील डोकलामचा विषय चीनच्या संसदेत जाऊन मांडायचा का?Aaditya Thackeray
आदित्य ठाकरे म्हणाले, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक अॅंगल आहेत, त्यामुळे ते पुढे यायला हवे. चांगला नेता आपण गमावला आहे. 2019-20 पासून अजित पवारांसोबत वेगळा बॉन्ड होता, अजित दादा काम करणारा नेता होता,
आदित्य ठाकरे यांनी बारामती विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळी यांच्या वरळी येथील घरी जाऊन कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर या अपघाताची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.
“Should We Go and Raise the Issue in Pakistan’s Parliament?” Aaditya Thackeray Questions
महत्वाच्या बातम्या
- भाजपसाेबत जाणार नाही.. नाही म्हणजे नाही, राज ठाकरे यांनी केले वृत्ताचे खंडन
- Sharad Pawar :विलीनीकरणाच्या चर्चेत जे उपस्थित नव्हते, त्यांना बैठकीबद्दल काय माहिती, शरद पवार यांचा सवाल
- Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार; पुण्यातील पाच आरोपींनी दिली कबुली
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रितीसंगमावर केले स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन