Amol Mitkari, : अजितदादांच्या विमानात होत्या सहा व्यक्ती! अमोल मिटकरी यांचा संशय निर्माण करणारा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Amol Mitkari, अजितदादा प्रवास करत असलेले विमान कोसळत असताना त्यातून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असताना त्यात मोठा स्फोट झाला, असे ते म्हणालेत. विमान अपघातात प्रथम 6 जण ठार झाल्याची माहिती देण्यात आली. पण घटनास्थळी पाचच मृतदेह सापडले. मग 6 वा व्यक्ती कोण? असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा विमान अपघाताबाबत संशय निर्माण झाला आहे.
आमदार अमोल मिटकरी म्हणाले, अजित पवारांचा मृत्यू झाला त्या दिवशी मी सायंकाळी 5 वाजता घटनास्थळी गेलो होतो. तेव्हा तेथील सरपंचाने मला धक्कादायक माहिती दिली. विमान कोसळत असताना त्यातून कुणीतरी बाहेर पडण्याची धडपड करत होते.Amol Mitkari,

त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही विमानाच्या दिशेने जात असताना अचानक स्फोट झाला हे मला त्यांनी सांगितले. सदर विमान अपघातात पहिल्यांदा 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. याचा अर्थ विमानात 6 जण होते. मग पाचच जणांचे मृतदेह कसे आढळले? तो सहावा व्यक्ती कुठे गेला? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी यावेळी केली.Amol Mitkari,



गोजुबावीचे सरपंच कल्याण आटोळे यांनी अजित पवारांच्या विमानाचा अपघात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, अपघातावेळी विमानाचा दरवाजा उघडा होता. एक निळी पॅन्ट घातलेला व्यक्ती बाहेर येतोय असे आधी वाटले, पण नंतर तसे काही दिसले नाही. हे विमान अजितदादांचे होते याची कल्पना आम्हाला नव्हती. ते एखाद्या उद्योगपतीचे असेल असे आम्हाला वाटले, असे त्यांनी अपघातानंतर सांगितले होते.

सरपंच कल्याण आटोळे यांनी या प्रकरणी शरद पवारांची भेट घेऊन त्यांनाही ही माहिती दिली. विमानाने कोसळण्यापूर्वी आकाशात 2 घिरट्या घातल्या. त्यानंतर खाली येत असताना हा अपघात झाला, असेही ते म्हणालेत. दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेकांनी संशय व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Six People Were Aboard Ajit Pawar’s Aircraft, Claims Amol Mitkari, Raising Fresh Suspicion

महत्वाच्या बातम्या