Chhagan Bhujbal : राष्ट्रीय अध्यक्ष पद तुम्ही सांभाळा, छगन भुजबळ यांचे सुनेत्रा पवारांना आवाहन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Chhagan Bhujbal राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निर्णयावर सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सोमवारी आणि मंगळवारी सुनेत्रा पवार या मुंबईत येणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्षपद तुम्हीच सांभाळले पाहिजे हे आम्ही त्यांना सांगणार आहोत. राष्ट्रीय अध्यक्षपद हे त्यांना दिले पाहिजे हे आमच्या महिला पदाधिकारी देखील म्हणत आहेत. पक्षाने सुनेत्रा पावर यांना उपमुख्यमंत्री आणि नेता बनवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा एकता तटकरे यांचा निर्णय नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.Chhagan Bhujbal

छगन भुजबळ म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी मला महापौर केलं होतं. शिवसेनेत असताना दोन वेळा मी महापौर झालो होतो. महापौर आणि आमदार दोन्ही होतो. राजकारण हे बदलत असतं, मुख्यमंत्री बदलतात प्रधानमंत्री बदलतात, महापौर बदलले असतील. निवडून आलेले लोक आहेत त्यांच्याकडे काय पुरावे आहेत. यांवर काहीच बोललं न बरं. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा सर्व पक्षाचा होता. एकटा तटकरे यांचा निर्णय नव्हता. सारखं सारखं तुम्ही देखील विचारता. पक्षाने उपमुख्यमंत्री आणि नेता बनवण्याचा निर्णय घेतला आहे असे भुजबळ म्हणाले.Chhagan Bhujbal



दरम्यान, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी दावा केला आहे की अजित पवारांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा होती. तशी चर्चा देखील झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेत्यांनी अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. या सगळ्यावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, विलीनीकरणाच्या कुठल्याही चर्चेत मला सहभागी करून घेतले नव्हते. मी त्या चर्चेचा भाग नव्हतो. त्यामुळे विलीनीकरणाबाबत मला काहीही माहित नाही. मी कुठल्याही बैठकीत सामील नसेल तर मला कुठलीही माहिती देण्यात आली नाही. हे कृपया टीव्हीवर दाखवा, असे आव्हाड म्हणाले.

Take Up the National President’s Post: Chhagan Bhujbal Appeals to Sunetra Pawar

महत्वाच्या बातम्या