विशेष प्रतिनिधी
मुंबई: Vijay Vadettiwar राज्यात वाढत चाललेल्या एलपीजी गॅस टंचाईचा फटका आता थेट विधानभवनालाही बसला असून गॅसअभावी विधानभवनातील कॅन्टीन बंद ठेवावी लागल्याची बाब समोर आली आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत सरकारकडून स्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली.Vijay Vadettiwar
सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच वडेट्टीवार म्हणाले की, काल रात्री सभागृहाचे कामकाज एक ते दीड वाजेपर्यंत चालले, मात्र आमदारांसाठी कॅन्टीनमध्ये जेवणाची व्यवस्था नव्हती. गॅस टंचाईमुळे कॅन्टीन बंद असल्याने आमदारांना अन्न मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच मंत्रालयातील कॅन्टीनही गॅसअभावी बंद पडल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.Vijay Vadettiwar
राज्यात गॅस टंचाईची गंभीर स्थिती
वडेट्टीवार यांनी सांगितले की, राज्यात एलपीजी गॅसचा तुटवडा दिवसेंदिवस वाढत असून अनेक ठिकाणी घरगुती गॅस मिळण्यात मोठा उशीर होत आहे. ओटीपी दिल्यानंतरही ग्राहकांना सुमारे 15 दिवसांनी सिलेंडर मिळत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे घरगुती ग्राहकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून घरची चूल कशी पेटवायची आणि स्वयंपाक कसा करायचा, असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा राहिला आहे.
या गॅस टंचाईचा परिणाम हॉटेल व्यवसायावरही होत असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबई आणि नागपूरसह काही शहरांमध्ये सुमारे 30 टक्के हॉटेल्स बंद झाली आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास पुढील काही दिवसांत आणखी हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे.
गॅस टंचाईमुळे राज्यातील काही भागांत नागरिकांनी आंदोलनही सुरू केले आहे. कोल्हापूर, विदर्भातील काही शहरांसह राज्यातील विविध भागांत नागरिकांनी गॅस पुरवठ्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
वडेट्टीवार यांनी या संपूर्ण परिस्थितीबाबत सरकारने सभागृहात अधिकृत निवेदन करून राज्यातील गॅस पुरवठ्याची खरी स्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी केली. त्यामुळे सरकारकडून या विषयावर लवकरच निवेदन येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Gas Shortage Hits Maharashtra: Legislature Canteen Shut Amid LPG Crisis
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेणार; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- Kalakar Katta : गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ वादात नवे वळण; वाहतूक अडथळ्याची अधिकृत नोंदच नाही
- उद्योगपती अनिल अंबानीच्या संबंधित कंपनीवर 15 ठिकाणी ईडीचे छापेमारी
- साेशल मीडियावर व्हायरल वक्तव्य प्रकरणी वसंत माेरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा