विशेष प्रतिनिधी
मुंबई: Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, अजितदादांनी आगामी अर्थसंकल्प २०२६–२७ साठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती आणि तो अर्थसंकल्प आता आपण स्वतः पूर्ण करणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.Devendra Fadnavis
फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन खाते होते. त्यांच्या निधनानंतर अर्थसंकल्पाचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितले की, “अजितदादांनी अर्थसंकल्पासाठी सखोल नियोजन केले होते. त्यांचे काम अपूर्ण राहू देणार नाही. उद्यापासून मी स्वतः या प्रक्रियेत लक्ष घालणार आहे.”Devendra Fadnavis
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, पक्ष जो निर्णय घेईल, त्याला भाजपचा आणि सरकारचा पूर्ण पाठिंबा असेल. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दोन वेळा माझी भेट घेतली आहे. पुढील दिशा आम्ही एकत्र बसून ठरवू. कोणताही अंतिम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू,” असेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांचे कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांच्या प्रत्येक निर्णयाला योग्य ते समर्थन दिले जाईल, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.
उद्या शपथविधीची शक्यता
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झाले आहे. त्यांच्या होकारानंतर उद्या (३१ जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक होणार असून, त्यानंतर सायंकाळी ५ नंतर सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
We will now complete Ajit’s budget ourselves, believes Chief Minister Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : यूजीसीच्या वादग्रस्त नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
- दादा, तुम्ही आमच्यात नाहीत हे मन मान्यच करायला तयार नाही, प्रताप सरनाईक यांचे हृदयस्पर्शी पत्र
- सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची नरहरी झिरवळ मागणी
- दारू आणि नियमभंग, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमागे वैमानिकाचा धक्कादायक भूतकाळ