कोथरुडमध्ये अमित शिंदेंवर कोयत्याने वार;त्यामागे निलेश घायवळ गँगचं नेमकं कनेक्शन समोर ?

विशेष प्रतिनिधी

पुणे :- मंगळवारी कोथरुडमध्ये अमित शिंदे यांच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली असून त्याबाबत निलेश घायवळच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात निलेश घायवळची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.Nilesh Ghaywal

बनावट कागदपत्रांच्या आधारे निलेश घायवळने अमित शिंदे यांच्या कोथरुडमधील मोबाईल दुकानातून सिमकार्ड घेतले होते. पोलिस तपासात ही बाब लक्षात आल्यानंतर अमित शिंदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर काल अमित शिंदेवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर येताच. हा हल्ला वैयक्तिक कारणातून झाल्याचं पोलिसांचे म्हणणं आहे मात्र, या हल्ल्याला निलेश घायवळच्या विरोधात दिलेल्या तक्रारीची पार्श्वभूमी आहे. निलेश घायवळ हा सप्टेंबर महिन्यात लंडनला पळून गेला असून परदेशातुन तो टोळी चालवत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



निलेश घायवळवर मोक्का कायद्यातंर्गत कारवाई झाली, त्यावेळी जे गुन्हे दाखल करण्यात आले, त्यामध्ये कोथरुड पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा देखील आहे. या प्रकरणात अमित शिंदे यांनी तक्रार दाखल केली होती. अमित शिंदे यांचं कोथरुडमध्ये दुकान आहे. अमित शिंदे यांच्या मोबाईल शॉपमधून बनावट कागदपत्रांच्या आधारे निलेश घायवळने एक सिमकार्ड घेतले होते. या सिमकार्डचा उपयोग तो बऱ्याच गुन्ह्यांसाठी करत होता. तपासात ही गोष्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी अमित शिंदे यांच्या फिर्यादीवरुन निलेश घायवळवर गुन्हा दाखल केला आहे.

निलेश घायवळवर मोक्का कायद्यातंर्गत कारवाई करण्याच्या प्रक्रियेत हा गुन्हा महत्त्वाचा ठरला होता. याच अमित शिंदे यांच्यावर एका टोळीकडून कोयत्याने हल्ला केला जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हल्लेखोरांना अद्याप अटक झालेली नाही. पोलिसांच्या दाव्यानुसार, हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला आहे. अमित शिंदे यांच्या नातेवाईकांकडूनच हा हल्ला घडवून आणण्यात आला, असा पोलिसांचा दावा आहे. मात्र, या सगळ्या हल्ल्यापाठी अमित शिंदे यांनी निलेश घायवळविरोधात दाखल केलेला गुन्हा असल्याची शक्यता आहे. निलेश घायवळ सप्टेंबर महिन्यात भारतातून लंडनला पळून गेला होता. दुसरीकडे त्याची टोळी पुण्यात असे हल्ले करत असल्यामुळे निलेश घायवळ गँग अजूनही सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.

कोथरुडमध्ये 8 ते 10 जणांकडून जीवघेणा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, अमित शिंदे कोथरूडमधील त्यांच्या मोबाईल दुकानात काम करत होते . मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते दुकानाबाहेर उभा असताना अचानक आठ ते दहा जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी अमित यांच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली.या हल्ल्यात अमित शिंदे ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या संपूर्ण घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्याच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून, हल्ल्यामागील नेमके कारण काय, की इतर कोणते कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहे.

Amit Shinde attacked with a sickle in Kothrud; has a direct link to the Nilesh Ghaywal gang come to light?

महत्वाच्या बातम्या